शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षात कऱ्हाडचा काय विकास झाला?

By admin | Updated: January 29, 2017 22:42 IST

रावसाहेब दानवे : कार्वेतील भाजपच्या सभेत पृथ्वीराज चव्हाणांवर टीका; पक्षावर आरोप करण्याचा अधिकार नाही

कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिणेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडून आल्यापासून काय विकास केला? या भागातील जनतेचे अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत. ज्या लोकांनी निवडून दिले त्यांना भेटण्यासाठीही साधा यांच्याकडे वेळ नाही. सत्ता असूनही या भागाचा विकास करता आला नाही. राज्यात आघाडी सरकारमध्ये असताना त्यांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला. त्यामुळे त्यांना जनतेने नाकारले,’ असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची कार्वे, ता. कऱ्हाड येथे रविवारी दुपारी प्रचार प्रारंभ सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपच्या उपाध्यक्षा नीता केळकर, कृष्णा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम माळी, स्वप्नील भिंगारदेवे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, प्रांतिक सदस्य अ‍ॅड. भरत पाटील, राजाभाऊ देशपांडे, पै. आनंदराव मोहिते, जगदीश जगताप, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, बाजार समिती माजी सभापती पै. शिवाजीराव जाधव, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले, ‘राज्यात नगरपालिका निवडणुकातील यशानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडणूक आणण्यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कऱ्हाडसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या तालुक्यात आजवर काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. त्याकाळी पृथ्वीराज चव्हाण यांनी या भागाचा काय विकास केला, हे दाखवून द्यावे. मुख्यमंत्री पदावर असताना त्यांना सत्तर हजार कोटी रुपये खर्च करूनही राज्यातील शेती भिजविता आली नाही. चोवीस टीएमसी पाणी अडविण्यासाठी काँगे्रस-राष्ट्रवादीला आठ वर्षे लागली. ते पाणी भाजपने एका वर्षात अडवून दाखवले. भाजपला शेतीतले कळत नाही. हा जातीयवादी पक्ष आहे, असा राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने सगळीकडे अपप्रचार पसरविला जातोय. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ सबका विकास’च्या माध्यमातून सर्व धर्मातील लोकांचा विकास केला आहे. सर्वच क्षेत्रात विकासाच्या कामांना सुरुवात केली आहे. उलट ६८ वर्षांत जे काँगे्रस राष्ट्रवादीला जमले नाही ते दोन वर्षांत भाजपाने करून दाखवले. त्यामुळे भाजपावर जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही.’ असेही यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले.डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘साडेतीन वर्षे येथील लोक अन्याय सहन करत आले आहेत. मात्र, आता हे सहन केले जाणार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी आमच्याकडे पुन्हा बघणार नाहीत, असे मतदान करा. पूर्वीच्या राजकारणाला आता लोक कंटाळले आहेत.’यावेळी डॉ. अतुल भोसले, पै. शिवाजीराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. निवासराव थोरात यांनी प्रास्ताविक केले. जगदीश जगताप यांनी आभार मानले. सभेस कार्वे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुनील जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)