शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मयुरी विचारतेय ‘त्या’ दोघी कशा आहेत?

By admin | Updated: January 4, 2016 00:48 IST

रात्रभर आईकडे विचारपूस : मुलाणी भगिनींच्या मृत्यूची बातमी न सांगण्याचा डॉक्टरांचा सल्ला

दत्ता यादव -- सातारा : आपल्या घराशेजारील दोघी मैत्रिणी हे जग सोडून गेल्या आहेत, याची पुसटशीही कल्पना मयुरीला नाही. अपघातामुळे तिच्या अंगामध्ये कणकणी असतानाही तिने रात्रभर आईजवळ ‘त्या’ दोघींची चौकशी केली. ‘आई त्या दोघी कशा आहेत ग,’ अशी वारंवार ती विचारत होती. कंठ दाटून आलेल्या आईला ‘त्या दोघी चांगल्या आहेत,’ असं अखेर नाईजास्तव सांगावं लागलं.मयुरी अन् तिच्या घराशेजारी राहणाऱ्या नजराना आणि मुस्कान जाईल तिकडे एकत्रच फिरायच्या. नोकरीही एकत्र ठिकाणीच करायची, असं मुस्कान आणि मयुरीनं ठरवलं होतं; पण नियतीला हे मान्य नसावं. मयुरीचं स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच मुलाणी भगिनींवर काळाने घाला घातला. लिंबखिंडनजीक महामार्गावर नव्याने झालेल्या एका मॉलमध्ये शनिवारी मुलाखतीसाठी दुचाकीवरून ट्रीपलसीट जात असताना कारने त्यांना भीषण धडक दिली. यामध्ये नजराना (वय २२)आणि मुस्कान मुलाणी (२०, रा. जानाई-मळाई हौसिंग सोसायटी सातारा) या सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी करूण अंत झाला. तर पाठीमागे बसलेल्या मयुरी गायकवाडचा दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला. अपघात झाल्यानंतर नेमकं काय घडलं, हे मयुरीला समजलंच नाही. केवळ जोराचा आवाज कानावर आला आणि डोळ्यावर अंधाऱ्या आल्या. रुग्णालयात नेल्यानंतर काहीवेळांतच ती शुद्धीवर आली. डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर मार लागल्याने ती विव्हळत होती. तिची प्रकृती पाहण्यासाठी नातेवाइकांनी तिला गराडा घातला होता. अधूनमधून ती अश्रूला मोकळी वाट करून देत होती. रात्री दहानंतर तिने ‘मुस्कान आणि नजराना कशा आहेत,’ असा आईला प्रश्न केला. तिच्या आईनेही ह्दयावर दगड ठेवून आणि अश्रू लपवून ‘त्या’ बऱ्या आहेत. एवढंच उत्तर दिलं; परंतु जसजशी तिला मुस्कान आणि नजरानाची आठवण यायची, तशी ती पुन:पुन्हा आईला ‘त्या कुठे आहेत, कशा आहेत,’ असे विचारायची. रात्री बराचवेळ ती जागी होती. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.नातेवाइकांची खबरदारी‘सध्या मयुरी मानसिक धक्क्याखाली आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याशिवाय मैत्रिणींचा मृत्यू झाला आहे, हे तिला सांगू नका,’ असा सल्ला डॉक्टरांनी नातेवाइकांना दिला आहे. त्यामुळे तिला पाहण्यासाठी येणाऱ्यांपैकी चुकून कोणी मुलाणी भगिनींविषयी बोलू नये, यासाठी मयुरीचे नातेवाईक प्रचंड खबरदारी घेत आहेत.