शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

नियुक्त आमदारांवर काय कारवाई केली?

By admin | Updated: October 25, 2014 23:45 IST

राष्ट्रपतींकडून विचारणा : याचिकाकर्त्याला तत्काळ माहिती देण्याचे मुख्य सचिवांना आदेश

सातारा : राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या निवडी रद्द करण्याच्या मागणीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आत्तापर्यंत राज्य शासन म्हणून आपण काय कारवाई केली, त्याची माहिती सातारा येथील याचिकाकर्त्याला तत्काळ देण्याचे आदेश राष्ट्रपती कार्यालयाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. ‘भारतीय राज्यघटनेच्या कलम १७१ अन्वये महाराष्ट्र विधानपरिषदेत बारा आमदारांची नियुक्ती राज्यपाल करतात. मात्र, या निवडी करताना घटनेतील तरतुदींचे उल्लंघन झाले असून, त्या रद्द कराव्यात,’ अशा आशयाची याचिका सातारा येथील सुशांत मोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटले होते की, ‘घटनेतील तरतुदीप्रमाणे साहित्य, कला, विज्ञान, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या योग्य व्यक्तींची निवड राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून केली जाते. मात्र, तत्कालीन राज्यपालांनी संबंधित नियुक्त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या लेखी पत्राच्या आधारे केल्या आहेत. सुशांत मोरे यांनी या याचिकेची एक प्रत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही पाठविली होती. ‘आपण त्यावर योग्य ती कारवाई करावी,’ अशी विनंतीही केली होती. त्यानुसार राष्ट्रपतींच्या कार्यालयातून महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना लेखी पत्र गेले असून, या कारवाईची माहिती तत्काळ राष्ट्रपती आणि याचिकाकर्त्याला देण्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुढील सुनावणीवेळी राष्ट्रपतींच्या आदेशाची प्रत न्यायालयात सादर करणार असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. मोरे यांच्या वतीने अ‍ॅड. एस. आर. बुरलकर, अ‍ॅड. विनायक पाटील, अ‍ॅड. रणजित आडे, अ‍ॅड. राजेश तोडकर काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)याचिकाकर्त्याशी संपर्क साधामुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची एक प्रत सुशांत मोरे यांनी दि. २ जून २0१४ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठविली होती. त्यानुसार ‘या याचिकेवर राज्य सरकारच्या मुख्य सचिवांनी काय कारवाई केली, याची माहिती याचिकाकर्ता आणि राष्ट्रपतींना कळविण्यात यावी. त्याचबरोबर या प्रकरणाबाबत आपणास अन्य काही माहिती हवी असल्यास याचिकाकर्ता मोरे यांच्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधावा,’ असेही राष्ट्रपतींच्या कार्यालयीन आदेशात म्हटले आहे.‘त्या’ आमदारांचे कार्य घटनेतील तरतुदीप्रमाणे नाही !‘राहुल नार्वेकर, रामराव वरकुडे, प्रकाश गजभिये, श्रीमती ख्वाजा बेग, विद्या चव्हाण, जगन्नाथ शिंदे, हुस्न बानू खलिफे, रामहरी रूपनवर, आनंदराव पाटील, जनार्दन चांदूरकर, अनंत गाडगीळ, जोगेंद्र कवाडे ही सर्व मंडळी राजकीय स्वरूपाच्या व्यक्ती आहेत आणि घटनेतील तरतुदीप्रमाणे त्यांचे भरीव कार्यदेखील नाही,’ असा आक्षेप मोरे यांनी घेतला आहे.