कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या सुरेखा पाटील, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण जाधव, माजी सरपंच तुकाराम डुबल, माजी ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ साळुंखे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुप्रिया पवार, साहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रतिभा लोंढे, पर्यवेक्षिका नीलम चौगले, अंगणवाडी सेविका अरुणा पाटील, इंदुताई लोहार, शालन कांबळे, प्रतीक्षा देसाई, संध्या सूर्यवंशी, मदतनीस शकुंतला सूर्यवंशी, अश्विनी यादव, वनिता सूर्यवंशी, सुनीता कुंभार, आक्काताई पुजारी व सुरेश शिंदे यांची उपस्थिती होती.
पंचायत समिती सदस्या सुरेखा पाटील म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिला अंधश्रद्धा, कर्मकांड यांना बळी पडतात. यातून त्यांना बाहेर काढून महिलांच्या अडचणी जाणून घेऊन सोडवाव्यात.
बाल विकास प्रकल्प अधिकारी सुप्रिया पवार यांनी महिलांचे आरोग्य, गरोदर माता व इतर उपक्रमांविषयी माहिती दिली.