शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई विजेती ललिता बाबरचे स्वागत

By admin | Updated: October 6, 2014 22:42 IST

पहिलीच खेळाडू ठरली आहे. तिने ही स्पर्धा ९ मिनिटे ३५ सेकंदांमध्ये पूर्ण

सातारा : मोही, ता. माण येथील आंतरराष्टीय खेळाडू ललिता बाबर हिने दक्षिण कोरिया येथे पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत ब्राँझ पदक मिळविले. या यशानंतर ती आज (सोमवारी) प्रथमच मायदेशी परतली. तिचे सातारा जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसएिशनतर्फे सातारा शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.यावेळी सातारा जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, राज्य अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव संजय वाटेगावकर, जिल्हा असोसिएशनचे सचिन काळे, नामदेव मोरे, राजगुरू कोचळे उपस्थित होते. आशियाई मैदानी स्पर्धेत पदक मिळविणारी ललिता बाबर ही पहिलीच खेळाडू ठरली आहे. तिने ही स्पर्धा ९ मिनिटे ३५ सेकंदांमध्ये पूर्ण केली आहे. या यशामुळे ललिता बाबर ही आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. जागतिक मैदानी स्पर्धेसाठी ललिता बाबरची निवड झाली आहे. आॅलिम्पिक तसेच जागतिक मैदानी स्पर्धेसाठी तिची तयारी सुरू आहे.ललिता बाबर म्हणाली, ‘आशियाई स्पर्धेत मिळालेल्या यशामुळे फारच आनंद झाला असून, मी सातारा जिल्ह्यातील असल्याचा अभिमान वाटत आहे. आगामी स्पर्धांसाठी माझा कसून सराव सुरू आहे. काहीही करून आॅलिम्पिक पदक जिंकून आणण्याचे स्वप्न बाळगले आहे. त्यादृष्टीने सराव सुरू करत आहे.’ पांडुरंग शिंदे म्हणाले, ‘ललिता बाबर हिने मिळविलेले यश जिल्ह्यासाठी कौतुकास्पद आहे. तिला जागतिक मैदानी स्पर्धा आणि आॅलिम्पिक स्पर्धेसाठी आर्थिक मदतीची गरज आहे. हिला जिल्ह्यातून भरभरून मदत मिळावी, या कामास प्रारंभ म्हणून पाच हजार रुपये देत आहे. जिल्हा अ‍ॅम्युचर अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे तिला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.’ वाटेगावकर म्हणाले, ‘आॅलिम्पिकसाठी पात्र ठरल्याने ती लवकरच स्पर्धेसाठी जाणार आहे. तिला मानसिक संतुलन कायम राखण्यासाठी तिचा गौरव करण्यात येणार आहे.’ (प्रतिनिधी)