शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आम्ही सज्ज

By admin | Updated: October 27, 2014 23:44 IST

दक्षता सप्ताह : अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली प्रतिज्ञा

सातारा : जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सोमवारपासून दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ झाला. जनजागृती सप्ताहानिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यादव यांनी शपथ वाचन केले. सातारा जिल्ह्यात दि. २७ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह होणार आाहे. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव ‘आम्ही भारताचे लोकसेवक याद्वारे गांभीर्यपूर्वक अशी प्रतिज्ञा करतो की, आम्ही आमच्या सर्व कार्यक्षेत्रात सचोटी व पारदर्शकता आणण्याचा सातत्याने आटोकाट प्रयत्न करू, आम्ही अशीही प्रतिज्ञा करतो की, जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी कार्य करू. आम्ही दक्ष राहून आमच्या संघटनेच्या वृद्धीसाठी व लौकिकासाठी कार्य करू. आमच्या सामुदायिक प्रयत्नांनी आम्ही आमच्या संघटनांना अभिमान प्राप्त करून देऊ आणि आमच्या देशबांधवांना मूल्याधिष्ठित सेवा पुरवू. आम्ही आमचे कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडू आणि भय किंवा पक्षपात या विना कार्य करू,’ अशा आशयाची शपथ दिली.शपथ दिल्यानंतर यादव यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘लाच देणे व घेणे हा गुन्हा आहे. शासन जनतेच्या हितासाठी राबवित असलेल्या अनेकविध विकास तसेच कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करून भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी संपूर्ण समाजानेच पुढाकार घ्यायला हवा. लोकसेवक हे जनतेचे मालक नसून सेवक आहेत. त्यांनी सेवक याच भूमिकेतून आपली कर्तव्य चोखपणे पार पाडावीत.’ निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख म्हणाले, ‘अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनहित जोपासून शासकीय कामे पार पाडावीत. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकालाच सन्मानाची वागणूक देणे तितकेच महत्त्वाचे आहे.’ उपअधीक्षक श्रीहरी पाटील म्हणाले, ‘लाच देणे व घेणे हा गुन्हा असून, भ्रष्टाचार अगर लाच मागणाऱ्या लोकांविरुद्ध तक्रार करावयाची असल्यास लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा.’यावेळी महसूल व अन्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)