शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाईतील सीसीटीव्ही यंत्रणेला ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 12:44 IST

वाई : शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा, कायदा व सुव्यवस्था रहावी यासाठी विविध चौकात व मुख्य रस्त्यावर वॉच ठेवण्यासाठी १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, सध्या ही यंत्रणा बंद पडल्याच्या स्थितीत आहे. सण, उत्सवांच्या काळात यंत्रणा सुरू राहणे आवश्यकआहे. तर सध्या या सीसीटीव्हीच्या देखभाल, दुरुस्तीसाठी पालिका प्रशासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.  

ठळक मुद्देसणांच्या काळात आवश्यकता चौक अन् मुख्य रस्त्यावर वॉच देखभाल, दुरूस्तीसाठी पत्र व्यवहार

वाई : शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा, कायदा व सुव्यवस्था रहावी यासाठी विविध चौकात व मुख्य रस्त्यावर वॉच ठेवण्यासाठी १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, सध्या ही यंत्रणा बंद पडल्याच्या स्थितीत आहे. सण, उत्सवांच्या काळात यंत्रणा सुरू राहणे आवश्यकआहे. तर सध्या या सीसीटीव्हीच्या देखभाल, दुरुस्तीसाठी पालिका प्रशासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.  

सुमारे तीन वर्षांपूर्वी विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, उद्योजकांनी शहरातील गुन्हेगारीला जरब बसून त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी एकूण १६ ठिाकणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. येथील विविध चौक, मोक्याच्या रस्त्यावर हे कॅमेरे बसविण्यात आले होते़ 

यामध्ये किसन वीर चौक, महागणपती चौक, चित्रा टॉकीज, शाहीर चौक, गंगापूरी, भाजी मंडई, नगरपालिका परिसर, चावडी चौक, वाई बसस्थानक, सह्याद्रीनगर स्टॉप यासह विविध महत्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते़  यामुळे गुन्हे उघड होण्यासही मदत होत होती. त्यामुळे गुन्हगारांना जरब बसत होती़  परंतू, अलीकडील काही महिन्यांपासून संपूर्ण शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडली आहे़  याचे कसलेही सोयरसूतक संबंधीत यंत्रणांना नाही़ 

सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी सामाजिक भावनेतून दिलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची साधी देखभालही संबंधीत यंत्रणा ठेऊ शकत नाही, याबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. याची जबाबदारी असणाºया यंत्रणेला प्रशासनाकडून देखभाल खर्च न दिल्यामुळे ही यंत्रणा बंद पडली आहे, अशी माहिती देण्यात येत आहे़  : सध्या सण, उत्सवांचा काळ आहे. यामध्ये दहीहंडी, स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सण आहेत. या सणांच्या दरम्यान, सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणेची नितांत गरज असते. गणेशोत्सव काळात मंडळांच्या सजावटी पाहण्यासाठी वाई शहर व परिसरातून मोठ्या प्रमाणात लोक येतात. अशावेळी  गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गैरफायदा घेण्याची शक्यता जास्त असते़  अशा परस्थितीत सीसीटीव्हीची मदत महत्वाची ठरते़  गुन्हेगारांना आळा बसविण्यास मदत होत असते़  सध्या सीसीटीव्ही यंत्रणा विस्कळीत झाल्याने नागरिकांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे़  सणांच्या पार्श्वभूमिवर सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णपणे सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे़  वाई शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सुरू रहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगरपालिकेकडे देखभाल व दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला आहे. सीसीटीव्ही दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.- विनायक वेताळ,पोलिस निरीक्षक वाई