शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

दत्तक गावांचा पाणीप्रश्न स्वनिधीतून मार्गी !

By admin | Updated: April 24, 2016 23:40 IST

शशिकांत शिंदेंचा उपक्रम : देऊरला टँकरने पाणीपुरवठा सुरू करून पालकत्व दाखविले

वाठार स्टेशन : आमदार आदर्श ग्राम योजनेत पालकत्व स्वीकारलेल्या देऊरकरांना शासन देत असलेले पाणी अपुरे पडत असल्यामुळे या गावाच्या पाण्यासाठी पुढाकार घेत आता कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्वनिधीतून १२ हजार लिटर क्षमतेचा १ टँकर सुरू करून खऱ्या अर्थाने पालकत्वाची भूमिका पार पाडली आहे.शासनाच्या टंचाईच्या निकषानुसार माणसी २० लिटर पाणी शासनाकडून उपलब्ध होणे गरजेचे आहे. देऊरची सध्याची लोकसंख्या ४ हजार १२५ एवढी असल्याने गावाला दररोज ८० हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे, असे असतानाही शासनाकडून केवळ ४८ हजार लिटर पाणी दिले जात आहे. शासनाचे हे पाणी अपुरे पडत असल्यामुळे देऊरकरांनी आमदार शिंदे यांच्याकडे पाण्यासाठी पाठपुरावा केला. यावर शासनाची वाट न बघता आमदार शशिकांत शिंदे यांनी स्वनिधीतून १२ हजार लिटर क्षमतेचा एक टँॅकर आता सुरू केला असून, हा टँकर दररोज १ खेप देऊरकरांना देणार असून, यानंतर तो भागातील बनवडी, अंबवडे (सं) वाघोली, रेवडी, तांबी, कोलवडी व गुजरवाडी या गावांनाही पाणीपुरवठा करणार आहे. देऊर गावास सध्या सहा दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. गावच्या स्वजलधारा योजनेच्या विहिरीतही अत्यल्प पाणी आहे तर नव्याने वसना नदी पात्रात काढलेल्या विहिरीतील पाणीसाठा ही कमी झाल्याने गावाला पाण्याची मोठीटंचाई जाणवत आहे. गावच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी अखेर शासनाकडे पाणी टँकर सुरू करण्याबाबत मागणी केली. यावर शासनाने २४ हजार लिटर क्षमतेच्या एका टँकरच्या दोन फेऱ्या म्हणजेच ४८ हजार लिटर पाणी सुरू केले आहे. आमदार शिंदे यांच्या माध्यमातून दररोज १२ हजार लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. या पाणी टॅकरचे विधिवत पूजन देऊर या ठिकाणी कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कदम व राष्ट्रवादी (युवक) चे कोरेगाव तालुकाध्यक्ष निलेश जगदाळे यांच्या हस्ते व देऊरच्या सरपंच निलिमा कदम, उपसरपंच बाळकृष्ण कदम, धनसिंग कदम, जि.प सदस्य राहुल कदम सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. गावास स्वतच्या बोअरवेलचे पाणी उपलब्ध केल्यबद्दल अजित कदम यांचा ग् सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)