शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लोणंदमधील १९ विहिरींच्या पाण्याची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:24 IST

लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. २ जुलै रोजी लोणंद मुक्कामी येत असून, मुक्कामाच्या वेळी लाखो ...

लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. २ जुलै रोजी लोणंद मुक्कामी येत असून, मुक्कामाच्या वेळी लाखो वारकरी लोणंदमध्ये दाखल होत असतात. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी आरोग्य विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. परिसरातील १९ विहिरींच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे.दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद यांच्यामार्फत भाविकांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा तत्काळ उपलब्ध होणार आहेत. तसेच आपत्कालीन सेवेसाठी खासगी दवाखान्यांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे प्रसिद्धी करण्यात आलीआहे.पालखी सोहळ्यात भाविकांना २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी चार वैद्यकीय पथकामध्ये ३३ वैद्यकीय अधिकारी, १३ औषध निर्माण अधिकारी, १७ आरोग्य सहायक, २ आरोग्य सहायिका, ४२ आरोग्यसेवक, ३० आरोग्य सेविका, ८ शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी पुरेशा प्रमाणात लागणारा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. भाविकांना स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी परिसरातील १९ विहिरींच्या पाण्याची तपासणी सातारा येथील जिल्हा प्रयोगशाळेमध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर टीसीएलची तपासणीही करण्यात आली आहे. भाविकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी १० ठिकाणी ३४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा देण्यासाठी पालखी तळावर, प्राथमिक आरोग्य केंद्र व घाटावर प्रत्येकी एक रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे.खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या हॉस्पिटलमधील उपलब्ध खाटांच्या संख्येपैकी १० टक्के खाटा भाविकांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. पालखी काळात शहरातील सर्व हॉटेल्स, फळविक्रेते, चहा व खाद्यपदार्थ विक्री करणाºया टपरीधारकांच्या तपासणीसाठी खास पथके नेमण्यात आली आहेत. त्यांना पाणी तपासणीचे अधिकार देण्यात आले आहेत. वरील सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंदचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत बागडे व त्यांचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये १०८ व १०२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या हॉस्पिटलमधील उपलब्ध खाटांच्या संख्येपैकी १० टक्के खाटा भाविकांसाठी आरक्षित आहेत.वारकºयांना लोणंदमध्ये आल्यानंतर आरोग्यविषयक गैरसोयीचा सामना करावा लागू नये. दूषित पाणी पिण्यास आल्यास साथीचे रोग पसरण्याची भीती असते. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने विशेष मोहीम राबविली आहे.वीज जोडणीसाठी स्वतंत्र व्यवस्थाआषाढी वारीकरिता वीज वितरण विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात सर्व पालखी व मुक्कामाच्या ठिकाणी वीज जोडणी देण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. याबाबत तालुका स्तरावरील अधिकाºयांशी संपर्क साधावा. अधिकृतपणे वीज जोडणी घेऊन संभाव्य धोका टाळावा व हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.