शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाठार स्टेशनला दहा दिवसांनी पाणी!

By admin | Updated: September 13, 2015 22:18 IST

कोरेगाव तालुका : दुष्काळी स्थिती; चाऱ्याचाही प्रश्न गंभीर, तलाव कोरडे

वाठारस्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात अत्यल्प पाऊस पडतो. सध्या तर पाझर तलाव पूर्ण रिकामे झाले आहेत. देऊर, वाठार स्टेशनसारख्या मोठ्या गावांत दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे या भागातील २६ गावांच्या पीक आणेवारीचा निकष स्वतंत्र लावावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. उत्तर-दक्षिण असा जवळपास ८० किलोमीटर विस्तारलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात सोळशी ते पळशीमधील गावांचा समावेश होतो. तर नागझरी, रहिमतपूर हा दक्षिण भाग म्हणून ओळखला जातो. भौगोलिकदृष्ट्या कोरेगावच्या उत्तर भागात तालुक्याच्या इतर भागापेक्षा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे; परंतु शासन दुष्काळ जाहीर करताना कोरेगाव तालुक्यातील एकत्र पीक आणेवारी घोषित करते. यामुळे दुष्काळ असून, तालुक्याच्या या भागचा निकष ५० पैशापेक्षा जास्त आणेवारी दाखवली जाते. यासाठी कोरेगाव तालुक्याच्या या भागातील गावासाठी वेगळा निकष लावून येथील पीक आनेवारी दाखवली जावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव कदम यांनी केली आहे.दरम्यान, कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात नेहमीप्रमाणेच यावर्षी मान्सूनचा पाऊस अत्यल्प पडला आहे. या पावसावर या भागातील शेतकऱ्यांनी शंभर टक्के खरिपाची पेरणी केली. त्यानंतर मात्र पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने या भागातील ९० टक्के पिके पाण्याअभावी वाया गेली आहेत. या भागात सध्या सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागासाठी असलेले छोटे पाझर तलाव पूर्ण रिकामे झाले आहेत. विहिरी कूपनलिकांतील पाणी संपण्याच्या मार्गावर आहे. देऊर, वाठार स्टेशनसारख्या मोठ्या गावांत दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. या गावांनी शासनाकडे प्रस्ताव देऊनही अद्याप गावाच्या गरजेइतपत पाणी प्रशासनाकडून मिळत नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.या भागात पडणाऱ्या अत्यल्प पावसामुळे या भागात सर्वाधिक प्रमाणात घेवडा, वाटाणा, सोयाबीन बटाटा, कांदा ही प्रमुख पिके घेतली जातात. सुरुवातीला पडलेल्या समाधानकारक पावसामुळे बऱ्याच वर्षांनंतर या भागात शंभर टक्के खरिपाची पेरणी झाली. त्यानंतर मात्र पावसाने अद्याप दडी मारली आहे. या भागातील पिके संपूर्ण वाया गेली आहेत. अशा परिस्थितीत या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडला आहे. या अडचणीतून या शेतकऱ्यांची सुटका होण्यासाठी शासनाने या भागातील पीक आणेवारी स्वतंत्र काढल्यास या भागाचा समावेश दुष्काळी भागात होऊन शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. (वार्ताहर) वाठार स्टेशन येथे पहिल्यांदा जनावरांसाठी जरंडेश्वर कारखान्याने चारा छावणी २००९ मध्ये काढली होती. सध्याची परिस्थिती २००९ च्या दुष्काळापेक्षा ही गंभीर असल्याने या भागातील पशुधन वाचवण्यासाठी शासनाने या ठिकाणी चारा छावणी सुरू करावी. या भागातील शेतकऱ्यांचे पशुधन वाचवावे. -विक्रम जाधव, वाठार स्टेशन