सातारा : येथील प्रभाग १९ मधील पोळ वस्तीलगतच्या वृंदावन गार्डनमधील सदनिकांचा पाणीप्रश्न नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्यामुळे निकाली लागला. या गृहप्रकल्पाला पॉवर हाउस येथील टाकीवरून पाणीपुरवठा करण्यात येणार असून याच्या जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
या कार्यक्रमास नगरसेवक रवींद्र ढोणे, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, पाणीपुरवठा विभागाचे लिपिक संदीप सावंत, विजय देशमुख या वेळी उपस्थित होते. वृंदावन गार्डन हा मंगळवारपेठेतील मोठा गृहप्रकल्प असून येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. गृहप्रकल्प विकासक व रहिवासी यांच्यातील वादामुळे या रहिवासी इमारतीचा पाणीप्रश्न बराच काळ प्रलंबित होता. येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही फारसा उपयोग झाला नाही. येथील महिलांनी यासाठी नगरसेवक ढोणे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने याचा निपटारा करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, स्वतंत्र दोन इंची पाइपलाइन मंजूर करून घेत येथील पाणीप्रश्न धसास लागला. पुढील आठ दिवसांत वृंदावन गार्डनचा पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने सुरळीत होईल, असेही ढोणे यांनी या वेळी सांगितले.
............फोटो आहे...!