शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पेरणीला फळ आलं या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 23:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कऔंध : ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत खटाव तालुक्यातील भोसरे गावाने राज्यात विभागून द्वितीय क्रमांक पटकाविला. कायम दुष्काळी खटाव तालुक्यातील भोसरेतील ग्रामस्थांनी ४५ दिवस तळपत्या उन्हात केलेल्या पाणी पेरणीला जणू फळंच आलं आहे. त्यामुळे या गावात आनंदाचं तुफानच आलं आहे.कायम दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी ८ एप्रिल ते २२ मे ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔंध : ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत खटाव तालुक्यातील भोसरे गावाने राज्यात विभागून द्वितीय क्रमांक पटकाविला. कायम दुष्काळी खटाव तालुक्यातील भोसरेतील ग्रामस्थांनी ४५ दिवस तळपत्या उन्हात केलेल्या पाणी पेरणीला जणू फळंच आलं आहे. त्यामुळे या गावात आनंदाचं तुफानच आलं आहे.कायम दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी ८ एप्रिल ते २२ मे या ४५ दिवसांत भर उन्हाळ्यात हजारो हात श्रमदान करीत होते.गट-तट विसरून एकदिलाने काम करीत होते. दुष्काळी भोसरे पाणीदार बनविण्याचे स्वप्न पाहिलेल्या ग्रामस्थांना रविवारी स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यावर आनंदाश्रू आवरता आले नाही. गावात एकच जल्लोष करण्यात आला.‘लोकमत’ला धन्यवाद‘भोसरे ग्रामस्थांनी केलेल्या कामाला ‘लोकमत’ने वेळोवेळी प्रसिद्धी दिल्यामुळे कामे करण्यास उत्साह निर्माण झाला.’ अशा शब्दात भोसरे ग्रामस्थांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.स्पर्धेच्या कालावधीत शिवजयंती, महाराष्ट्र दिन, बुद्धपौर्णिमा हे सणही ग्रामस्थांनी श्रमदानाच्या ठिकाणी जाऊन श्रमदान करत गावकºयांनी साजरे केले.नववधू-वरांसहवºहाडी मंडळींनीही श्रमदानसिनेअभिनेते आमिर खान, किरण राव, मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रिया खान, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचेसह अनेक मान्यवरांनी श्रमदान करून उत्साह वाढविला. दोन जवानांनी श्रमदानाच्या ठिकाणी लग्न करून नववधू वरांसह वºहाडी मंडळींनीही श्रमदान करीत आदर्श निर्माण केला. गावच्या विकासाचा प्रश्न येईल, त्यावेळी अशीच एकजूट करून कामे करतील,’ अशा भावना अनेकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.हृदयात धडधड अन् डोळ्यात अश्रूस्पर्धेचा निकाल ऐकण्यासाठी दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी पुण्यात हजेरी लावली. चढत्याक्रमाने नंबर घोषित व्हायचे तसतसे हृदयात धडधड वाढायची. तिसºया क्रमांकापर्यंत नाव आले नाही म्हणजे भोसरे पहिले किंवा दुसरे असणारच असा विश्वास मनात होता. द्वितीय क्रमांकाचा निकाल घोषित झाल्यावर अक्षरश: स्टेडियममध्येच जल्लोष केला.