शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-देवघरचे पाणी शेखमीरेवाडीत खळाळणार

By admin | Updated: January 21, 2017 21:00 IST

मकरंद पाटील : कालव्याच्या कामाबाबत संभ्रम निर्माण करू नये

खंडाळा : ‘नीरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी खंडाळा तालुक्यातील लाभक्षेत्राखालील गावांना मिळावे. यासाठी आजपर्यंत सातत्याने प्रयत्न केले. कालव्याच्या कामातील अनेक तांत्रिक अडचणींवर मात करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे नीरा-देवघर कालव्याद्वारे येत्या चार दिवसांत पाणी शेखमीरेवाडीपर्यंत पोहोचेल,’ अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.खंडाळा येथील ११ गावांतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या पाण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘नीरा-देवघर कालव्याद्वारे खंडाळा तालुक्यातील २४ गावे लाभक्षेत्रात येत आहेत. या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच ठेवली आहे. मात्र, या कालव्यात अनेक अडचणी होत्या. त्या सोडविण्यासाठी बराच अवधी गेला. विशेषत: सांगवी येथील ओढ्यावरील पुलाचे बांधकाम वनविभागाच्या जागेची परवानगी त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावरील ५०० मीटर कालव्याचे क्रॉसिंग करण्यासाठी येथील जमिनीतील २४० खातेदारांचा शोध घेण्याची मोहीम राबवावी लागली.ही क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील महत्त्वाची अडचण दूर झाली आहे. त्यामुळे लोकांच्या भावनेचा आदर करून येत्या चार दिवसांत प्रजासत्ताक दिनापर्यंत पाणी ४८ किलोमीटर शेखमीरेवाडीपर्यंत पोहोचले जाईल. तालुक्यातील बहुतांशी कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. वाघोशीपर्यंत पाणी पोहोच-विण्यासाठी मोर्वे येथील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेतल्या जातील. यावेळी सभापती नितीन भरगुडे-पाटील, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मनोज पवार, यशवंत साळुंखे, अजय भोसले, लक्ष्मण चव्हाण, मयूर भोसले, राजेंद्र भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)पोटपाटाची कामे मार्चनंतर सुरू...‘मोर्वे गावच्या हद्दीतील दोन किलोमीटर अंतरातील कालव्याचे कामही येत्या काही दिवसांत वेगाने करण्यात येईल.’ ते पूर्ण होताच वाघोशीपर्यंत पाणी जाण्यात कोणतीही अडचण राहणार नाही. याशिवाय या कालव्याच्या पोटपाटाची कामेही मार्चनंतर हाती घेण्यात येतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचेल. या परिसरातील गावांनी, शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये. या कालव्याच्या कामाबाबात कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये,’ असे आवाहन आ. मकरंद पाटील यांनी केले.