शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सातारा जिल्ह्यात पाण्याचे गणित कोलमडणार..!

By admin | Updated: April 4, 2017 17:02 IST

तीव्र पाणीटंचाई, उन्हाच्या चटक्यात हातपंपही मोजतायत अखेरची घटका

आॅनलाईन लोकमतकातरखटाव (जि. सातारा), दि. ४ : खटाव तालुक्याच्या पुर्व भागात बहुतांश जलस्त्रोत कोरडेठाक पडत चालल्यामुळे ग्रामीण भागातील कातरखटाव, एनकूळ, खातवळ, कणसेवाडी, हिंगणे, तडवळे, बोंबाळे या गावात तिव्र पाणी टंचाई निर्माण होवू लागली आहे. हंडा-दोन हंडा पाण्यासाठी कोसो दूर रानोमाळ पायपीट करावी लागत असून गावगाडा हाकणा-या ह्यगावकारभा-यां समोर, जर वर्षी प्रमाणे पाणी प्रश्न आवासून उभा राहील्यामुळे नक्की कोणत्या मुद्याला तोंड द्यायचं हा प्रश्न पडलाय. तालुक्याचा पुर्व भाग हा बेभरवशी पर्जन्यमानांवर अवलंबुन असल्यामुळे ह्यकभी खुशी कभी गम,अशी अवस्था जर साल पहायला मिळत आहे यात काही काडी मात्र शंका नाही. जानेवारी महीना ओलांडला की या भागातील पाण्याची पातळी खालावली म्हणून समजायचचं..! त्यामुळे जबाबदारीचं भान नसलेल्या ग्रामपंचायती व प्रशासन यांच्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जात असून कळशीभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करू लागला आहे.काही ग्रामपंचायतीचे सरपंच ह्यगाव कारभारी, म्हणतात ग्रामपंचायत लय अडचणीत आहे. अगोदर पाणीपटटी, घरफळा भरा मगचं पाण्याची सोय होईल. तर दुसरीकडे कारभा-यांनी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विज पंपाचे बिलचं थकित ठेवल्याने..जोर का झटका देणा-या महावितरणने विज कनेक्शन तोडलेलं दिसून येत आहे.तर तिसरीकडे कातरखटावसह भागातील गावंगाडा चालवणा-यांच्याकडे सरासं घरगुती वैयक्तीक बोअर असल्यामुळे सर्वसामान्यांची हंडाभर पाण्यासाठी होणारी पायपीट किंवा पाणी टंचाई काय कळणार असा भागातून सूर उमटत आहे. कणसेवाडी, खातवळ, एनकूळ या डोंगराळ भागातील लोकांना डोक्यावर हंडा घेवून दगड-धोंड्यातून वाट शोधत एक-एक कि.मी. पायपीठ करावी लागत आहे. खातवळमध्ये गावस्वरूपी विहीरीने तळ गाटला असून नळाला चार दिवसाला कसंबसं पंधरा ते विस मिनिटे पाणी येत असल्यामुळे इतर दिवशी कोण चार कळश्या पाणी देतयं का. महीलांना व मुलाबाळांना ओढ्या वस्त्यांवर भटकंती करावी लागत आहे.तडवळे,बोंबाळे या गावात ह्यह्यचला पाणी पाहीजे..मग प्रति बॅरलला ३० ते ४० रुपए दिवसाला मोजत रहा, अशी परंपरा पडू लागली आहे.गत वर्षी कातरखटाव ग्रामपंचायतीने येरळवाडी धरणातून खाजगी पाईपलाईनद्वारे गावाला नळपाणीपुरपठा केला होता पण यासाठी येणारा भरमसाठ खर्च घरफळा व पाणीपटटी न भरल्यामुळे चालू वर्षी पाणी मिळणं अशक्यचं दिसून येत आहे. कातरखटाव या चार हजार लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या गावाचं गेली चाळीस वर्षे झाली घरपट्टी-पाणीपट्टीचं गणितच ग्रामपंचायत, गावकारभारी, प्रशासन यांना अजून सुटेना व ताळमेळ लागेनासे झालेलं आहे. वषार्नुवर्षे ताळेबंद न लागणाऱ्या या ग्रामपंचायतीची थकबाकी फुगत चालली आहे. किती ग्रामसभा आल्या आणि किती गेल्या त्यातील मुद्दे फक्त कागदोपत्री राहत चालले आहेत. करवसुली काही होत नाही आणि जनता-जनार्धन मनाने काही ग्रामपंचायतीमध्ये घरपट्टी किंवा पाणीपट्टी आणून भरत नाहीत.

आमक्याची एवढी थकबाकी आहे... तमक्याची तेवढी आहे. त्यांची अगोदर वसुली करा. मगच मी भरतो, अशा परंपरागत चालत आलेल्या गोंधळामुळे लाखो रुपये थकले आहेत. त्यामुळे सध्या विकासकामासाठी पदरमोड करून गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांना व गावकारभाऱ्यांना अस्सं वाटू लागलंय की, जनता-जनार्धन नक्की कोणता मुद्दा घेऊ हाती, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)माण-खटाव तालुक्यांत हरितक्रांती हवी...

लोकांची मानसिकता बदलण्याची गरज याचा अर्थ एकच होतो की, घरपट्टी व पाणीपट्टी न भरता पाणीटंचाई दूर व्हावी व शेतीसाठीसुद्धा पाणीपट्टी न भरता हरितक्रांती व्हावी, दुष्काळी परिस्थितीमध्ये वस्तुस्थितीचं भान ठेवायचं झालं तर आम्ही अभिमानाने सांगतो की, महाराष्ट्रातील सर्व धरणांमध्ये ज्यावेळी मृत साठा शिल्लक असतो त्यावेळी उरमोडी धरणामध्ये जूनअखेर पाच टीएमसी पाणीसाठा शिल्लक असतो. खरे सांगायचं झालं तर दुष्काळी भागासाठी हाच पाणीसाठा राखीव आहे. परंतु ते पाणी खर्च भरल्याशिवाय मिळत नाही. त्यामुळे दुष्काळी भागाचा तो पाणीसाठा तसाच शिल्लक राहतो, ही मोठी शोकांतिका आहे. प्रश्न कायमस्वरूपी मिटवायचा असेल तर पाणी उचलण्याचा खर्च शासनाने त्यांच्या अदांजपत्रकात तरतूद करण्याची गरज आहे किंवा लोकांनी व शेतक ऱ्यांनी पाणीपट्टी भरून माण-खटाव या दोन तालुक्यांत हरितक्रांती केली पाहिजे. उरमोडीचा पाणी उचलण्याचा येणारा खर्च फक्त शासनच भरेल या अपेक्षेवर न राहता लाभधारक शेतक ऱ्यांनी काही निधी जमा केला तर उरमोडीचा कालवा प्रवाहित होईल यासाठी लोकशिक्षणाची व लोकसहभागाची चळवळ कशी निर्माण होऊन मानसिकता बदलण्याची गरज आहे.