शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी उशाला... कोरड घशाला!

By admin | Updated: October 16, 2015 00:57 IST

माण तालुका : बंधाऱ्याला दरवाजे बसविण्याची मागणी

शरद देवकुळे -- पळशी  माण तालुक्यातील पळशी येथील माणगंगा नदीवरील कोल्हापूरपद्धतीच्या बंधाऱ्याला दरवाजे न बसविल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून, पाण्यावाचून रब्बी हंगाम वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. बंधाऱ्याला तत्काळ दरवाजे बसविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.पळशी येथील तोरशे वस्तीनजीक माणगंगा नदीवर कुकडी पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत दहा वर्षांपूर्वी बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. यावर्षी लोधवडे परिसरात जोरदार पाऊस झाल्याने माणगंगा नदी वाहू लागली; पण बंधाऱ्याला दरवाजेच नसल्याने पाणी अडवले जात नाही. परिणामी पाण्याचा अपव्यय होत आहे.हा बंधारा सर्वात मोठा असून, पाण्याचा साठा अंदाजे चार-पाच किलोमीटरपर्यंत असल्याने पळशी, जाशी, मणकर्णवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. या बंधाऱ्याला दरवाजे बसविले तर हजारो एकर जमीन ओलिताखाली येऊ शकते, असे जाणकार सांगतात. बंधाऱ्यात पाणी असूनही ते वाया जात आहे. त्यामुळे ‘पाणी उशाला... कोरड घशाला’ अशी परिस्थती पळशी परिसरात निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, कांदा, मका अशा पिकांच्या पेरण्या केल्या आहेत. तर काही ठिकाणी पेरण्या अद्यापही सुरूच आहेत. जर बंधाऱ्याला दरवाजे बसविले नाहीत, तर रब्बी हंगाम वाया जाऊ शकतो. तरी संबंधित विभागाने त्वरित बंधाऱ्याला दरवाजे बसवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतूमधून जोर धरू लागली आहे. बंधाऱ्यात पाणी असल्याने वेळोवेळी संबंधित विभागाला याबाबत कळवूनदेखील बंधाऱ्याला दरवाजे बसविले जात नाहीत. यावर्षी नदीला पाणी आले; पण बंधाऱ्याला दरवाजे नसल्याने रब्बी हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.-प्रशांत खाडे, शेतकरी, पळशी