शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरणातील पाणीसाठा मे अखेर संपणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:02 IST

पाटण : तीव्र दुष्काळामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या पाणी मागणीचा भार सतत कोयना धरणातील पाणीसाठ्यावर वाढत चालला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत ...

पाटण : तीव्र दुष्काळामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या पाणी मागणीचा भार सतत कोयना धरणातील पाणीसाठ्यावर वाढत चालला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत कोयना धरणातील पाणी पायथा वीजगृह आणि नदी विमांचकद्वारे सांगलीकडे सोडणे सुरू आहे.आजअखेर कोयना धरणात केवळ ३१.०५ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक असून, कोयना धरणातील पाणीसाठ्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही. त्यामुळे मे अखेर कोयनेतील पाणीसाठा संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. असे झाले तर जूनच्या पहिल्या पंधरा दिवसांचे नियोजन काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. मात्र, वीजनिर्मितीचा वाढता आलेख आणि कर्नाटक, सांगलीकडील पाणीटंचाईचे दुर्भिक्ष यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा एप्रिल आणि मे महिन्यात अत्यंत झपाट्याने खालावला आहे. सध्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक आणि नदी विमांचकमधून १००० क्युसेक पाणी धरणातून नदीपात्रात सोडणे निरंतर सुरू आहे. यापुढे पाऊस सुरू होईपर्यंत क ोयना धरणातील पाणी सांगलीकडे सोडणे बंद होईल, अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आता मे महिन्याचे उरलेले १९ दिवस आणि शिल्लक पाणीसाठा ३१ टीएमसी हे गणित वीजनिर्मिती आणि पूर्वेकडील सिंचनासाठी होणारा पाणीवापर पाहता जुळेल की नाही, याची शाश्वती नाही.जरी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू झाला नाही तर मात्र, कोयना धरणात खडखडाट होऊन राज्याची पाणीबाणी अधिकच बिकट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आहे. तत्पूर्वी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी कोयना धरणातील पाणी राज्याबाहेर देऊ नये, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.मात्र आजअखेर तरी त्यांच्या मागणीचा प्रभाव लागू झालेला दिसत नाही.जूनमध्ये पाऊसतरी संकट राहणारजूनमध्ये पाऊस वेळेवर सुरू झाला तरी कोयना धरणात सुरू होण्याची पाण्याची आवक ही जेमतेम १५ दिवस पाऊस झाला तर त्यानंतर सुरू होते. त्यामुळे जलसंपदा विभागाने जूनमधील कालावधीत काय ठरविले आहे?