शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

गॅस क्लोरिनेशन प्रणालीद्वारे पाणी

By admin | Updated: April 7, 2016 23:51 IST

किरणराज यादव : ‘नगरोत्थान’मधून पाण्यासाठी ६५ लाखांचा निधी

कोरेगाव : ‘नगरविकास विभागाच्या अत्यंत महत्त्वाच्या नगरोत्थान योजनेद्वारे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नवनिर्मित कोरेगाव नगरपंचायतीसाठी ६५ लाखांचा निधी पाणी योजना विस्तारीकरण व बळकटीकरणासाठी मंजूर केला आहे. या निधीतून जुनी पाणी शुद्धीकरण यंत्रणेऐवजी नवीन आधुनिक गॅस क्लोरिनेशन प्रणाली बसविली जाणार आहे,’ अशी माहिती प्रशासक किरणराज यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्य सरकारने कोरेगावात नगरपंचायत स्थापनेनंतर अवघ्या १९ दिवसांतच शहरातील पाणी योजनांचा आढावा घेतला होता. पाणी योजनांची यंत्रणा जुनी असल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विनय कुलकर्णी यांच्यासह अभियंत्यांच्या टीमने पाणी योजनांची अत्यंत बारकाईने पाहणी करून नगरोत्थान योजनेतून पाणी योजना विस्तारीकरण व बळकटीकरणासाठी सुमारे एक कोटीचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हाधिकारी मुदगल यांना सादर केले होते. मार्च अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांनी ६५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. पाणी शुद्धीकरणासाठी जुन्या टी.सी.एल. प्रणालीला मूठमाती देऊन नव्याने मंजूर झालेल्या निधीद्वारे आधुनिक गॅस क्लोरिनेशन प्रणाली बसविली जाणार आहे. वसना-वांगणा नद्यांच्या संगमावरील जॅकवेल, पंपिंग स्टेशन, कठापूर योजनेतील मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती, आरफळ कॉलनी ई. एस. आर. साठी नवीन जलवाहिनी, एअर व्हॉल्व्ह दुरुस्ती केली जाणार आहे. पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शशिकांत शिंदे व जिल्हा नियोजन अधिकारी हणमंतराव माळी यांनी परिश्रम घेतल्याने कमीत कमी कालावधीत निधी मंजूर झाला असून, कामाला तातडीने सुरुवात केली जाणार असल्याचे यादव यांनी सांगितले. (प्रतिनिधी) मलकापूर पाठोपाठ कोरेगावात प्रकल्प...नगरपंचायत स्थापनेनंतर महिना संपण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने मुबलक निधी उपलब्ध करून दिल्याने विकासकामांना आता सुरुवात होणार आहे. पाणी शुद्धीकरणाबाबत प्रशासनाने पुढाकार घेतला असून, जिल्ह्यात केवळ मलकापूर (कऱ्हाड) येथेच आधुनिक गॅस क्लोरिनेशन प्रणाली कार्यान्वित आहे. मलकापूर पाठोपाठ आता कोरेगावात ही यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याने जनतेला शुद्ध पाणी मिळणार आहे. दलित वस्ती सुधारण्यासाठी २५ लाखांचा निधी...शहरातील दलित वस्ती सुधारण्यासाठी स्वतंत्रपणे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून रस्ते, गटार्स, जलवाहिनी व इतर विकासकामे केली जाणार आहेत, असे यादव यांनी सांगितले.