शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

धरणातला पाणीसाठी अडकला ‘गाळात’!

By admin | Updated: May 30, 2016 00:44 IST

पाणी साठणार तरी कसं? : क्षमतेएवढं पाणी साठतच नसल्याचं वास्तव चित्र

 सागर गुजर -- सातारा  साताऱ्यासह सांगली जिल्ह्याचे शेतीक्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या जिल्ह्यातील धरणांतील गाळ हा मोठा प्रश्न सध्या आ वासून उभा आहे. जिल्ह्यामध्ये जलसिंचनाचे तब्बल ३१ लहान-मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांनी सलग दोन वर्षे पडलेल्या दुष्काळाशी लढण्याचे बळ लोकांना दिले; परंतु यापैकी बहुतांश प्रकल्पांमध्ये गाळाचे साम्राज्य साठले असल्याने येत्या पावसाळ्यात जरी चांगला पाऊस झाला, तरी पाणी साठविण्यावर मर्यादा येणार आहेत. पावसाळ्यामध्ये धरणांतील पाणीसाठ्याचे परिमाण जलसंपदा खात्याकडे असते; परंतु वास्तवात धरणांत साठलेल्या गाळामुळे क्षमतेइतकेही पाणी धरणांमध्ये साठू शकत नाही, हे वास्तव चित्र आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरण प्रकल्पांतील गाळच काढला जात नसल्याने वर्षानुवर्षे गाळाचे प्रमाण वाढतच चालले आहे. साहजिकच गाळामुळे पाणी साठविण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे पाऊस कितीही झाला तरी एका मर्यादेच्या पलीकडे पाणी साठवता येत नसल्याने धरणांतील पाणी नदीत सोडून दिले जाते.पावसाळ्यामध्ये धरणांतील पाणीसाठ्याची आकडेवारी उपलब्ध होते, ती या साठलेल्या गाळासकट असते. गाळ वगळून पाण्याची मोजदाद निश्चितच कमी भरते. गळती झालेल्या कालव्यांमुळे पाणी वाया जाते, हे डोळ्याने दिसणारे चित्र आहे; परंतु धरणांच्या पोटात साठलेल्या गाळाला जलसंपदा खाते कोणता ‘मायक्रोस्कोप’ लावणार आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. या साठलेल्या गाळाबाबत कोणी चकार शब्द काढायला तयार नाही. गाळ काढल्यास मोठा पाणीसाठा निर्माण होऊ शकतो. प्रकल्पनिहाय क्षमता व उद्देशउरमोडी-परळी जवळच्या या धरणाची ९.९६ टीएमसी इतकी पाणी साठविण्याची क्षमता आहे. या धरणाद्वारे सातारा, खटाव, माण तालुक्यांतील एकूण २७ हजार ७५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.धोम-बलकवडी या धरणाची ४.०८ टीएमसी इतकी पाणी साठवण क्षमता आहे. भोर, खंडाळा, फलटण तालुक्यांती १८ हजार १०० हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली येणार आहे.तारळी-पाटण तालुक्यांतील डांगिष्टेवाडी येथील या धरणाची ५.९५ टीएमसी इतकी आहे. या धरणाद्वारे सातारा, खटाव, माण, पाटण, कऱ्हाड तालुक्यांतील १४ हजार २७३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणायचे आहे.महू-हातगेघर - कुडाळी नदीवरील या धरणाची क्षमता ०.२६ टीएमसी इतकी असणार आहे; या धरणाद्वारे जावळी तालुक्यातील ५ हजार ३२७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणावयाचे असून, गेल्या कित्येक वर्षांपासून या धरणाचे काम रखडलेले आहे.मोरणा-गुरेघर- पाटण तालुक्यातील मोरणा नदीवर गुरेघर गावाजवळ १.३९६ क्षमतेचे हे धरण असून, याद्वारे पाटण व कऱ्हाड तालुक्यांतील ३ हजार ८०६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणावयाचे आहे.