शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मनोरंजनाच्या पैशातून जलसंधारणाची कामे

By admin | Updated: April 11, 2016 00:51 IST

म्हावशी गावाचा निर्णय : यात्रेतील तमाशा, कुस्त्यांचा आखाडा यंदा रद्द

खंडाळा : खंडाळा तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावोगावी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी म्हावशी, ता. खंडाळा येथील ग्रामस्थांनी यात्रेतील मनोरंजनाचे कार्यक्रम न घेता त्या पैशातून जलसंधारणाची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.म्हावशी येथे ग्रामदैवत बाळसिद्धनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. देवाच्या धार्मिक विधीबरोबरच पालखी छबिना, लोकनाट्य तमाशा, कुस्त्यांचा आखाडा असे विविध कार्यक्रम घेतले जातात. यावर लाखो रुपये खर्च होत असतात.यावर्षी सर्वत्रच दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत गावच्या पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे होणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन ग्रामस्थ व यात्रा समितीने नियोजन बैठकीत यात्रेत तमाशा व कुस्त्यांचा आखाडा न भरविण्याचा निर्णय घेतला.मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी होणारा एक ते दीड लाख रुपयांचा खर्च वाचणार असून तो जलसंधारणाच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. यातून ठिकठिकाणी सिमेंट बंधारे, ओढ्याची खोली वाढविणे, अशी कामे करून पाणीसाठा वाढविण्याचा प्रयत्न होणार आहे.दुष्काळात उपयुक्त पाणीसाठ्याचा वापर कसा करावा, गावची पाण्याची गरज भागविण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता गावाने मिळून जलसंधारणासाठी प्रयत्न करायला पाहिजेत, याचे उदाहरण म्हावशी गावाने घालून दिले आहे. (प्रतिनिधी)नोकरदारांच्या एकीतून परिवर्तनम्हावशी गावात नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. गावच्या या निर्णयात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. गावातील सर्व नोकरदारांनी प्रत्येक एक हजार रुपये निधी गोळा करून तो जलसंधारणासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थ व नोकरदारांचा निधी मिळून मोठे काम मार्गी लागणार आहे.