शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

दोन सोसायट्यांना २५ वर्षांनंतर आले पाणी!

By admin | Updated: May 24, 2016 00:48 IST

महाबळेश्वर पालिका : दूषित पाण्यावर उपाय एकदाचा शोधला; नैसर्गिक झऱ्यावरील अवलंबित्व संपुष्टात

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील मुन्नवर हौसिंग सोसायटी व जिजामाता हौसिंग सोसायटीमध्ये नगरसेवक कुमार शिंदे यांच्या अथक प्रयत्नामुळे या दोन्ही सोसायटीमध्ये तब्बल २५ वर्षांनंतर महाबळेश्वर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजना चालू करण्यात यश आले. यावेळी पाणी सोसायटीमध्ये आल्यानंतर कुमार शिंदे यांच्याकडून पाण्याची पूजा करून नारळ वाढविण्यात आला. अखेर कुमार शिंदे यांनी दोन्ही सोसायटीमध्ये जलक्रांती घडवून आणली, असे शब्द स्थानिक युवकांच्या तोंडून येऊ लागले व स्थानिक महिला वर्गाने आमदार मकरंद पाटील, नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल, नगरसेवक कुमार शिंदे व इतर नगरसेवकांना आणि मुख्यधिकारी सचिन पवार व पाणीपुरवठा विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. या दरम्यान सोसायटीचे अध्यक्ष ख्वाजाभाई वारुणकर, तोफिक पटवेकर, माजी नगरसेवक दयानंद सपकाळ, सरदार शेख व सोसायटीमधील सभासद व पाणी पुरवठा कर्मचारी उपस्थित होते. दोन्ही सोसायटीमधील महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या दोन्ही सोसायटीमध्ये सुमारे २५० ते ३०० घरांची वस्ती आहे व येथील लोकसंख्या नऊशे ते एकहजार आहे. मुन्नवार हौसिंग सोसायटीमध्ये दोन विहीर आहेत तर जिजामाता हौसिंगमध्ये एक जीवंत झरा आहे. एप्रिल व मे महिन्यात विहिरींची पातळी खाली गेली असल्यामुळे पाण्याची कमतरता भासत होती, तर जिजामाता मधील झऱ्याचे पाणी दूषित झाले असल्यामुळे पाणी पिण्यासाठी वापरत नाही. या पाण्यामुळे अनेक जणांना आजारपणाला सामोरे जावे लागले. अशातच दोन्ही सोसायटीला डांबरी रस्ता नसल्यामुळे पाण्याचा टॅकर येत नाही. यावेळी महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असे, अशा अनेक पाण्याबाबत समस्या या दोन्ही सोसायटीमध्ये निर्माण होत आहेत; परंतु नगरसेवक कुमार शिंदे यांनी आमदार मकरंद पाटील यांना या विषयाबाबत माहिती दिल्यानंतर आ. पाटील यांनी या विभागासाठी लागणाऱ्या पाईपलाईन बाबत जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाईप लवकरात लवकर उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिकेच्या बैठकीत पाण्याबाबतचा विषय घेऊन लगेचच टेंडर काढण्यात आले व हे काम ठेकेदारास देऊन कामाचे उद्घाटन आमदार मकंरद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर वेळो वेळी कुमार शिंदे यांनी महाबळेश्वर वनविभागाकडून येणाऱ्या अडचणींना अनेक वेळा पालिकेमधून पत्र व्यवहार करून वनविभागाच्या हद्दीमधून पाईपलाईन टाकून घेण्यास मंजुरी घेण्यात आली. (प्रतिनिधी)पाण्याचा वनवास सुटल्याने आनंदोत्सवतब्बल तीन ते चार महिन्यांनंतर हे काम पूर्ण झाले व दोन्ही सोसायटीमधील सर्व सभासदांना पालिकेतून नळकनेक्शन अर्ज भरण्यात आले व अखेर २२ मे रोजी या दोन्ही सोसायटीचा २५ वर्षांनंतर पाण्याचा वनवास सुटला पाणी जसे सोसायटीत चालू झाले तसे महिलांनी कुमार शिंदे यांचे कौतुक केले व दोन्ही सोसायटीमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला व यावेळी कुमार शिंदे यांनी पाणी प्रश्नाप्रमाणेच रस्त्याचे काम देखील अंतिम टप्प्यात असून, लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.