शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:40 IST

सातारा : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने शहर परिसरात पाणी टंचाई भेडसावू लागली आहे. असे असताना काही नागरिकांसह व्यापाऱ्यांकडून पाण्याची ...

सातारा : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने शहर परिसरात पाणी टंचाई भेडसावू लागली आहे. असे असताना काही नागरिकांसह व्यापाऱ्यांकडून पाण्याची नासाडी केली जात आहे. मात्र, अद्याप पालिकेने कारवाई मोहीम हाती घेतली नाही. शहराला कास व शहापूर योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. कासचा पाणीसाठा झपाट्याने खालावू लागला आहे. तांत्रिक अडचणींमुळे शहापूर योजनेचा पाणीपुरवठा वारंवार बंद ठेवावा लागतो. या परिस्थितीत पाणी काटकसरीने वापरण्याऐवजी काही नागरिक, व्यापारी नासाडी करीत आहेत. बोगदा परिसर, गुरुवार पेठ, शनिवार पेठ, देवी चौक, केसरकर पेठ व माची पेठेत काही ठिकाणी हे चित्र दररोज पाहावयास मिळत आहे.

रस्त्याची दुरवस्था

सातारा : सातारा - कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. चार किलोमीटर लांबीचा हा घाटरस्ता ठिकठिकाणी उखडला असून, खड्ड्यांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. घाटातील संरक्षक कठडेही ढासळले असून, हा घाटमार्ग वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाचे तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

पारा ३५ अंशांवर

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात थंडीची तीव्रता ओसरली असून, नागरिकांना उन्हाचा तडाखा बसत आहे. सोमवारी हवामान विभागाने सातारा शहराचे कमाल तापमान ३१.३, तर किमान तापमान १६.२ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. महाबळेश्वरचा पाराही सोमवारी २४ अंशांवर स्थिरावला. उकाड्यात वाढ झाल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हामुळे शीतपेयांच्या मागणीत वाढ झाली आहे.

भटक्या कुत्र्यांची दहशत

सातारा : शहारात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही कुत्री पादचाऱ्यांसह नागरिकांच्या अंगावर धावून येत असल्याने नागरिकांसह महिलावर्गात भीतीचे वातावरण आहे. पालिकेने भटक्या कुत्र्यांना पकडून सोनगावजवळील कोंडवाड्यात सोडण्याचा ठराव सभेत मंजूर केला आहे. मात्र, यावर अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही

बसस्थानकात

घाणीचे साम्राज्य

सातारा : मध्यवर्ती बसस्थानकात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्यावतीने बसस्थानकाची स्वच्छता करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती जैसे थे झाली. परिवहन विभागाने कचरा संकलनाची व्यवस्था करावी, अथवा या ठिकाणी कचराकुंडी ठेवावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांमधून होत आहे.

रस्त्याचे डांबरीकरण

सातारा : सातारा - ठोसेघर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांसह वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. अनेक वर्षांपासून सुरू असलेली परवड थांबल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

कांद्याचे दर स्थिर

सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असून, दर मात्र स्थिर आहेत. सध्या ४० ते ५० रुपये प्रतिकिलो या दराने कांद्याची विक्री केली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून दर स्थिर असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दुरुस्तीची मागणी

सातारा : मेढा - महाबळेश्वर मार्गावर असलेल्या केळघर घाटातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. घाटातील संरक्षक कठडे ढासळले असून, कोठेही दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील संरक्षक कठड्यांचीही डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.