वाई : वाई शहर व परिसरामध्ये नागरिकीकरण झापाट्याने वाढत आहे. याचे कारण शहराचे ऐतिहासिक महत्त्व, प्रसिद्ध पर्यटनस्थळ व राहण्यासाठी चांगले वातावरण. यामुळे मुंबई, पुण्यातील नागरिकांची पसंती वाईमध्ये सदनिका घेण्यासाठी आहे़ पण, नागरिकीकरण वाढत चालले आहे तसतसे मूलभूत सुविधा पुरविणा-या यंत्रणावर ताण येत आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे़यशवंतनगर ग्रामपंचायत ही वाई शहरास लागून असल्याने झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प तयार होत आहेत. त्याप्रमाणात त्यांना मूलभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यामध्ये गटार, कच-याचे व्यवस्थापन, पाणीपुरवठा या सुविधा देणे आवश्यक आहे. परंतु यशवंंतनगर येथील सोनजाई देवीरोड मुख्य रस्ता व उपगल्ल्यांमध्ये गटराची व्यवस्था नसल्याने मैला, सांडपाणी खुल्यावर सोडले आहे़ त्यामुळे दूषित पाण्याची डबकी साठल्याने डासांचे प्रमाण वाढल्याने साथीचे आजार होण्याची शक्यता वाढली आहे़ तसेच येथे बांधलेल्या एका इमारतीला व इतर घरांना मैला, सांडपाणी सोडण्यासाठी गटराची सोय नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मुख्य रस्त्यावर गटराची सोय नसल्याने मैला व सांडपाणी सोडल्याने येथील नजीकच्या शासकीय हातपंपाचे पाणी दूषित झाले आहे. ते पिण्यास अपायकारक आहे़ तसेच मुख्य रस्त्याच्या बाजूने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेली असून, त्यामध्ये दूषित पाणी शिरण्याची शक्यता आहे़ वाई-बावधन रोडवर दवाखान्यापुढील बावधनकडे जाताना नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण झाल्यामुळे तेथील पाण्याचा नैसर्गिक प्रवाहाला अटकाव झाल्याने पाणी रस्त्यावर साठत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे़ या प्रश्नाबाबत ग्रामपंचायतीस निवेदन दिले असून, अनेक ग्रामसभेत हा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर ठोस कार्यवाही झाली नाराजी व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी) नागरिकांनी अनेकवेळा निवेदने दिली. प्रत्यक्ष अवस्था दाखवण्यात आली; पणग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही़ तरी प्रत्यक्ष उपाययोजना करावी़-संपतराव सावंत, नागरिकनागरिकांनी कचरा कोठेही टाकू नये, तसेच दूषित पाण्यांच्या डबक्यांमुळे साथीचे रोगपसरण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवतो़ तेव्हा योग्य उपाययोजना करावी़- अॅड़ अर्जुन ननावरे, नागरिकग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कचरा संकलनासाठी घंटागाडी सुरू आहे. नागरिकांनी कचरा घंटागाडीत टाकावा, तसेच सोनजाई रोड परिसरातील रहिवासी वस्तीसाठी भुयारी गटार योजना मंजूर करीत आहोत, त्यामुळे तेथील समस्या संपतील. ---महेश सावंत, उपसरपंच यशवंतनगर
वाईत नागरिकीकरणाला गैरसोयींचा विळखा
By admin | Updated: November 14, 2014 23:18 IST