शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चेतक होता की कृष्णा? हे तर तुम्हालाच ठाऊक: शिवेंद्रसिंहराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:00 IST

सातारा : ‘मंगळवार तळ्यातील विसर्जनास बंदी करण्याची पत्रे तुम्ही आणि तुमच्या मातोश्रींनी प्रशासनाला दिली. ते पत्र घ्यायला चेतक आला होता का कृष्णा? हे तुम्हालाच माहिती. पत्रावर सही करताना झोपेत होता का तंद्रीत होता? का तुमचा मोत्या सही घेताना तुम्ही भिंतीला धरून उभा होता?’ असा घणाघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार ...

सातारा : ‘मंगळवार तळ्यातील विसर्जनास बंदी करण्याची पत्रे तुम्ही आणि तुमच्या मातोश्रींनी प्रशासनाला दिली. ते पत्र घ्यायला चेतक आला होता का कृष्णा? हे तुम्हालाच माहिती. पत्रावर सही करताना झोपेत होता का तंद्रीत होता? का तुमचा मोत्या सही घेताना तुम्ही भिंतीला धरून उभा होता?’ असा घणाघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केला.खासदार उदयनराजे यांनी दिलेल्या उत्तरला प्रत्युत्तर देताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘मी म्हणेल तसंच झालं पाहिजे, या अट्टाहासापोटी खासदारांनी साताऱ्यातील गणेशमूर्ती विसर्जनाचा प्रश्न चिघळवला. काहीही झाले तरी मंगळवार तळ्यात विसर्जन करणारंच, अशी आडमुठी आणि अडेलतट्टू भूमिका घेणारे खासदार आता माझ्यामुळेच प्रशासनाने कृत्रिम तळे खोदल्याचे सांगत आहेत. मंगळवार तळे का कृत्रिम तळे? नेमकी तुमची भूमिका काय होती, हे एकदा स्पष्ट करा.’२०१५ मध्ये पाणीटंचाई होती, असे सांगून तुम्ही सातारकरांना भुलवू नका. अगदी ६० वर्षांत कधीही मंगळवार तळे आणि मोती तळ्यातील पाणी कोणीही पिण्यासाठी वापरलेले नाही. त्यामुळे टंचाईचा आणि या तळ्यांचा संबंधच नाही. टंचाईचे नियोजन करण्यासाठी विसर्जनास बंदी आणल्याचे धादांत खोटे सांगणारे खासदार सातारकरांना तळ्यातील घाण पाणी पाजणार होते काय? विसर्जनाचा प्रश्न निर्माण करून नागरिकांना, गणेश मंडळांना आणि जिल्हा प्रशासनाला वेठीस धरून तुम्ही काय मिळवले? केवळ थापेबाजी आणि डायलॉगबाजी करून प्रश्न सुटत नसतात, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.सातारा पालिकेनेच तुम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवली नसून पालिकेने मंगळवार तळ्यात विसर्जनास बंदी केली असल्याने तुमचे नाकच कापले गेले. त्यामुळे तुमचा तीळपापड होत असून, तुमचे मानसिक संतुलन ढळत चालले आहे. ज्या पालिकेत एकहाती सत्ता आहे,त्याच पालिका प्रशासनाने न्यायालयाचे आदेश पाळण्याचा निर्णय घेतला असून, त्या आदेशाप्रमाणे मंगळवार तळ्यात विसर्जन करण्यास पालिकेनेही बंदी केली आहे. आमच्या संस्थांबद्दलचे तुणतुणे वाजवणे बंद करा. तोंड दाखवायला जागा नसल्याने तुम्ही मुद्द्याला बगल दिली, हे पळपुटेधोरण सातारकरांना कळून चुकले आहे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.मला दाढी आहे म्हणून येतेमाझी दाढी आणि विसर्जन याचा काही संबंध आहे का? पण विषयाला बगल देण्यासाठी तुम्ही दाढीकडे गेलात. माझ्या दाढीची काळजी तुम्ही करू नका. मला दाढी आहे म्हणून दाढी येते. तुम्हाला उगवती का नाही आणि उगवली तर, राहील का नाही, अशी चिंताजनक अवस्था तुमची आहे. तुमच्या लहरीपणामुळे विसर्जनाची काय परिस्थिती झाली? ज्या मंगळवार तळ्यात विसर्जन होत होते ते तुम्ही मायलेकराने बंद पाडले आणि आता त्याच तळ्यात विसर्जन करण्याचा अट्टाहास करून हम करे सो कायदा, करण्याचा प्रयत्न तुम्ही केला, अशी टीकाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.