शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

योद्धे कोण आज स्पष्ट होणार!

By admin | Updated: February 12, 2017 22:40 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी राष्ट्रवादी, काँगे्रस, भाजप व शिवसेना या पक्षांच्या नेतेमंडळींनी आठवडाभरापासून जोरदार प्रयत्न केले. रविवारी रात्री उशिरापर्यंत अनेकांची मनधरणी करण्याचे काम सुरू होते. याचा ‘आऊटपूट’ सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी पाहायला मिळणार आहे. निवडणुकीची दंगल सुरू झाली असतानाच भाजपने राष्ट्रवादी व काँगे्रसमधील नाराजांसाठी जिल्हाभर रथ फिरविला. या रथात राष्ट्रवादी व काँगे्रसचे अनेकजण बसले. भाजपने तिकिटे देऊन त्यांना ‘अधिकृत’ करून घेतले. काहींना भविष्यातील मोठी आश्वासनेही देण्यात आली आहेत. उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागेल, या भीतीने अनेकजण ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.अनिल देसाई, अमित कदम, सचिन गुदगे, सह्याद्री कदम, माजी खासदार गजानन बाबर, दिनकर शिंदे, प्रभाकर साबळे ही मंडळी कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये दाखल झाली. यापैकी बहुतांश मंडळींना अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपने उमेदवारी देऊ केली आहे. दोन्ही काँगे्रसमधील नाराज मंडळी उमेदवारी अर्ज कायम ठेवून आहेत. या नाराजांची मनधरणी करण्याचे काम गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे. राष्ट्रवादीने आपल्या आमदारांकडे याची जबाबदारी सोपवली आहे. काँगे्रसही स्थानिक नेतृत्वाच्या माध्यमातून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. यात कितपत यश आले आणि निवडणुकीत योद्धे कोण असणार, हेही आज स्पष्ट होईल. (प्रतिनिधी).पुरस्कृतचे अभ्यंगस्नानकाही जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये अपक्षांना पुरस्कृत करून घेण्याच्या हालचाली सर्वच पक्षांनी सुरू ठेवल्या आहेत. एबी फॉर्म दिलेली काही मंडळीही सध्या ‘गॅस’वर आहेत. आपले तिकीट कापले जाऊ नये, यासाठी ही मंडळी सावध आहेत. तर पुरस्कृतचे अभ्यंगस्नान घडलेली मंडळी कामाला लागली आहेत.