शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मारामाऱ्या होणारच; मिटवामिटवी चालणारच!

By admin | Updated: March 1, 2016 00:11 IST

अमोल मोहिते : प्रभाग आठमधील नगरसेवकांची ‘लोकमत’ कार्यालयात बिनधास्त बॅटिंग

सातारा : प्रभागात भांडणे आणि हाणामाऱ्या सातत्याने होतात आणि विकासकामापेक्षा अधिक रस या भांडणांमध्ये घेतला जातो, असा आरोप नगरसेवक अमोल मोहिते यांच्यावर केला जातो. त्याला उत्तर देताना ते बिनधास्तपणे म्हणतात, ‘मारामाऱ्या तर होत राहणारच. भागात शांतता राखण्यासाठी शेवटी आम्हाला मिटवामिटवी करावी लागणारच. त्यामुळे विकासकामांबरोबरच अशा गोष्टींमध्येही कधीकधी रस घ्यावाच लागतो.’‘लोकमत टीम’च्या प्रभागदौऱ्यानंतर चार नगरसेवकांनीही ‘लोकमत’ कार्यालयात स्वच्छंद फटकेबाजी केली. प्रभागातील नागरिक समस्या मांडायला पुढे येत नसल्याबद्दल अशोक मोने, अमोल मोहिते, दिनाज शेख आणि सुजाता राजेमहाडिक यांना विचारण्यात आले, त्यावेळी सर्वांनी वेगवेगळी मते नोंदविली. परंतु नागरिक मतप्रदर्शन करीत असताना कार्यकर्त्यांनी तटस्थ राहावे, या अशोक मोने यांच्या मताशी सर्वांनीच सहमती दर्शविली. नेत्यांमुळेच जनतेत आपल्याला मान मिळाला असल्याचे दिनाज शेख यांनी सांगितले. प्रभागातील एका घटनेच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले. ‘जनसंपर्क आणि इतर बाबींमध्ये तुमचे पतीच अधिक सक्रिय असतात, असे लोकांचे म्हणणे आहे,’ हे निदर्शनास आणून दिले असता त्या म्हणाल्या, ‘ते अधिक अनुभवी आहेत. मी त्यांचे मार्गदर्शन घेते; मात्र स्वत:चा जनसंपर्क ठेवला आहे.’नगरपालिकेत तुमच्या नावाची दहशत आहे का, या प्रश्नाला ‘मी तर नगरपालिकेत फार जातही नाही. फोनवरूनच कामे करून घेते,’ असे सांगून बगल देण्याचा प्रयत्न सुजाता राजेमहाडिक यांनी केला. मात्र, ‘चांगल्या कामासाठी दहशत असली तर काय बिघडले,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. अशोक मोने यांनी पालिकेतील आपली ही सहावी टर्म असल्याचे सांगत जनसंपर्क आणि केलेल्या कामांमुळेच आपण एकेकाळी विरोधकांच्या जोरदार लाटेतही निवडून आलो होतो, याची आठवण बोलताना करून दिली. यावेळी चार वर्षांत प्रभागात केलेल्या कामांची यादी नगरसेवकांनी सादर केली. सर्वांनीच आपापल्या भागातील बहुतांश प्रलंबित कामे पूर्ण केल्याचा दावा केला. काही किरकोळ कामे प्रलंबित असली, तरी त्यातील अनेक मंजूर असून, आगामी काळात ती पूर्ण होतील, असा विश्वास नगरसेवकांनी व्यक्त केला. (लोकमत चमू)