शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम करायचंय? ..भरा डिपॉझिट!

By admin | Updated: December 30, 2014 23:28 IST

नवीन नियमावली : अनधिकृत बांधकामाला बसणार लगाम

दत्ता यादव -सातारा  -तुम्ही मंजूर आराखड्यापेक्षा जास्त बांधकाम करीत नाही ना? ओढ्यावर अतिक्रमण तर करत नाही ना? तुम्ही नाही म्हणाल; पण पालिका आता तुमच्यावर भरोसा ठेवणार नाही. बांधकाम सुरू करताना डिपॉझिट भरा आणि आराखड्याप्रमाणे बांधकाम आहे, हे सिद्ध करून पैसे परत न्या.. पण तेही बिनव्याजी.सातारा शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा फार पूर्वीपासून गाजत आहे. वर्षानुवर्षे केवळ अतिक्रमण हाच मुद्दा घेऊन विरोधकांपासून ते नागरिकांपर्यंत सर्वच जणांना अतिक्रमण हा शब्द आता ‘अति’ व्हायला लागलेय, असे वाटू लागले आहे.शहरात सध्या सुमारे १२० इमारतींची बांधकामे सुरू आहेत. मात्र अनेकजण पूर्णत्वाचा दाखला पालिकेतून नेत नाहीत. मनाला वाटेल तसे अतिक्रमण करून बांधकाम केले तरी बेहत्तर, अशी मानसिकता ठेवून अतिक्रमण करत होते. या सर्व प्रकाराला आता लगाम बसणार आहे. ज्याला नवीन बांधकाम करायचे आहे, त्या बांधकामाचे जेवढे क्षेत्रफळ आहे, तेवढे पैसे पालिकेत ‘सुरक्षा अनामत रक्कम’ म्हणून जमा करावी लागणार आहे. शंभर रुपये प्रतिचौरसप्रमाणे जेवढे पैसे होतील, तेवढे पालिकेच्या तिजोरीत हे पैसे जमा होणार आहेत. सरासरी एका बांधकाम व्यावसायिकाला दोन लाख रुपये जमा करावे लागतील.बांधकाम पूर्ण होईपर्यंत हे पैसे पालिकेतच असणार आहेत. तेही बिनव्याजी. अनेकजण बांधकाम करताना इमारतीचे काम अगदी रेंगाळत करत असतात. त्यांना खरं तर या नवीन नियमावलीचा चांगलाच फटका बसणार आहे. जर का वेळेत काम केले नाही, तर त्यांचे पैसे त्यांना परत मिळण्यास तितकाच वेळ जाणार आहे. परिणामी भरलेल्या पैशावर मिळणारे व्याज पालिकेला मिळणार आहे. त्यामुळे साहजिकच पैसे परत मिळावे म्हणून लवकर बांधकाम उरकण्याकडे बांधकाम व्यावसायिकांचा कल असणार आहे.पालिकेकडे आलेले डिपॉझिट पालिकेच्या स्वतंत्र खात्यावर जमा होत असते. त्यातून पालिकेला व्याजही मिळते. त्यामुळे पालिकेची तिजोरी हाऊसफुल्ल होणार आहे. शहरातील विकासकामांनाही ही रक्कम त्यांना वापरता येणार आहे. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेता काहीजण पालिकेच्या डोळ्यात धूळफेक करत होते, अशांना आता ‘सेफ डिपॉझिट’मुळे चपराक बसणार आहे. पूर्वी मंजूर आराखड्याप्रमाणे अनेक ठिकाणी कामे झाली नाहीत, असा सातत्याने आरोप होत होता. परंतु भविष्यात ‘सेफ डिपॉझिट’मुळे मंजूर आराखड्यानुसारच कामे होतील, अशी पालिका प्रशासनाला आशा आहे. काही महिन्यांपूर्वी नवीन नियमावली सुरू झाल्यानंतर सातारा पालिकेने सर्वात अगोदर त्याची अंमलबजावणी सुरू केली. सेफ डिपॉझिटचा दर किती ठेवायचा यामध्येच इतर पालिकांचा खल सुरू आहे. पण शंभर रुपये प्रतिचौरसप्रमाणे जेवढे पैसे होतील, तेवढा दर ठरवून पालिकेने ही रक्कम जमा करायलाही सुरूवात केली आहे. शहरात सध्या सुमारे १२० बांधकामे सुरू असून या सर्वांकडून पालिकेने ‘सेफ डिपॉझिट’ म्हणून सुमारे १ कोटी घेतले आहेत. त्यामुळे पालिकेला आता मोठा आर्थिक हातभार लागला आहे. या नवीन नियमावलीमुळे मंजूर आराखड्याप्रमाणे कामे होतील. नागरिकांनीही मंजूर आराखड्याप्रमाणे बांधकाम करावे आणि तातडीने बांधकाम पूर्ण करून आपले डिपॉझिट परत न्यावे. - प्रशांत राजे (नगररचनाकार )