शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लेक चालली सासरला; घोड्यावरून श्रीवंदनाला !

By admin | Updated: January 24, 2017 23:35 IST

कवठे : ससाणे परिवाराकडून सावित्रीच्या लेकीचे घोड्यावरून देवदर्शन

कवठे : विवाह सोहळ्यावेळी प्रत्येक गावात नवरदेव घोड्यावरून श्रीवंदनाला जातो. मात्र, आपल्या लाडक्या लेकीचीही हौसमौज व्हावी व मुला एवढीच मुलगीही श्रेष्ठ आहे, हा संदेश समाजात पोहोचावा, यासाठी कवठे येथील ससाणे परिवाराने आपल्या लाडक्या लेकीचे श्रीवंदन चक्क घोड्यावरून केले. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली. याचाच वसा घेऊन कवठे, ता. वाई येथील माळी समाजाची भारती व काशिनाथ ससाणे यांची लाडकी लेक दीपिकाने पदवी शिक्षण पूर्ण केले व तद्नंतर डी.एड पूर्ण केले. काशिनाथ ससाणे यांना दोन मुली व एक मुलगा. पैकी दीपिका हे शेंडफळ. घरातील सर्वांची लाडकी व घरातील शेवटच्याच मुलीचे आज लग्नकार्य. या सावित्रीच्या लेकीची पाठवणुकीत कोणतीही कसर न ठेवता धुमधडाक्यात श्रीवंदन करावयाचे असे ससाणे परिवाराने ठरवले. दीपिकाने मात्र आपले श्रीवंदन मिरवणूक ही मुलांच्या प्रमाणे घोड्यावरूनच झाली पाहिजे हा हट्ट धरला. या निमित्ताने हा क्रांतिकारक निर्णय लग्नानिमित्त बैठक बोलावून भावकीसमोर मांडला गेला. भावकीमध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली. पहिल्यांदाच गावात वधूचे अशा प्रकारे श्रीवंदन होत असल्याने सांगोपांग चर्चा घडली व भावकीने एकमुखाने या स्त्री हक्क समानतेच्या अनोख्या श्रीवंदनाला होकार दिला. बँडपथकाच्या तालावर दीपिका घोड्यावर विराजमान झाली. ‘जा जा मुली तू सासरी जा जा मुली,’ या गाण्याच्या सुरुवातीने श्रीवंदन सुरू झाले. मुलाच्या श्रीवंदनासाठी मुलाच्या घोड्यापाठीमागे मिरवणुकीत सर्व उपस्थित राहतात. तसे उपस्थित राहून मिरवणूक यशस्वीरीत्या पूर्ण केली व आपल्या सावित्रीच्या लेकीचा हा हट्ट पुरविला. यामध्ये गावातील लोकही बहुसंख्येने उपस्थित राहून ससाणे या अनोख्या श्रीवंदनात सामील झाले होते. (वार्ताहर)विवाह सोहळ्याचा थाट बदलतोय...!विवाह सोहळ्याचा थाट बदलतोय. काही वर्षांपूर्वी विवाह सोहळा सुमारे पाच दिवसांचा असायचा. दळणवळणाच्या इतर सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील दळणवळणाचे एकमेव साधन असलेल्या बैलगाड्यांमधून वऱ्हाडी मंडळींना आणण्याची सोय असायची. पहिल्या दिवशी मूळ गावाहून निघायचे. उशिरा त्याठिकाणी पोहोचायचे. त्या रात्री वऱ्हाडी मंडळींचा पाहुणचार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हळद लावणे वगैरेचा कार्यक्रम व्हायचा. तिसऱ्या दिवशी देवक काढण्याचा कार्यक्रम तर चौथ्या दिवशी विवाहाचा विधी व त्यानंतर पाचव्या दिवशी पाठवणीचा दिवस. सध्या हा पाच दिवसांचा विवाह सोहळा काही तासांवरच येऊन ठेपला आहे.