शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

साताऱ्याला चला; पण हायवेला उतरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:03 IST

जगदीश कोष्टी।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : स्वारगेट बसस्थानकातून सांगली, कोल्हापूर, कोकणात जाणाºया एसटी गाड्यांचे वाहक ‘सातारा, सातारा...’ असे ओरडत असतात. त्यांची गाडी साताºयात आल्यानंतर सातारा बसस्थानकासाठी शहरात न येता महामार्गावरच उभी केली जाते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुणे आणि कोल्हापूर या दोन मोठ्या शहरांच्या ...

जगदीश कोष्टी।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : स्वारगेट बसस्थानकातून सांगली, कोल्हापूर, कोकणात जाणाºया एसटी गाड्यांचे वाहक ‘सातारा, सातारा...’ असे ओरडत असतात. त्यांची गाडी साताºयात आल्यानंतर सातारा बसस्थानकासाठी शहरात न येता महामार्गावरच उभी केली जाते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुणे आणि कोल्हापूर या दोन मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी सातारा आहे. तसेच पुण्याहून कोकणात जाणाºया गाड्याही साताºयातून जात असतात. त्यामुळे सातारा मध्यवर्ती बसस्थानकात एसटीची मोठी वर्दळ असते. दिवसभर एकाच वेळी तीन-चार गाड्या उभ्या असतात. त्याचप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातर्फेही विना थांबा सेवा पुरविली जाते. त्यामुळे सातारकरांची खूपच चांगली सोय होत असते.असंख्य सातारकर शैक्षणिक, व्यवसायाच्या निमित्ताने दररोज पुण्याला जात असतात. दिवसभर काम करून ते रात्री साताºयाला येण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात येतात. तसेच अहमदनगरकडून रात्री साताºयाला येण्यासाठी सोय नसल्याने सातारकरांना पुणेमार्गे यावे लागते. ही मंडळीही शिवाजीनगर बसस्थानकातून स्वारगेटला येतात.स्वारगेट बसस्थानकात रात्री दहानंतर विनाथांबा गाडी बंद झालेली असते. त्यामुळे प्रवाशांना इतर विभागांच्या गाड्यांवर अवलंबून राहावे लागते. सांगली, कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी या गाड्या मोठ्या संख्येने तेथे उभ्या असतात. या गाड्यांमधील वाहकही ‘चला सातारा, साताराऽऽऽ’ असे ओरडतात. त्यामुळे प्रवासी धावत येऊन गाडीत बसतात. काही गाड्यांचे वाहकही गाडी गावात जाणार नसल्याचे सांगतात; पण बहुतांश वाहक याची पूर्वकल्पना देत नाहीत.एसटी सुरू झाल्यानंतर स्वारगेट बसस्थानक सोडून गाडी मार्गस्थ झाल्यानंतर तिकीट काढण्यासाठी ते जवळ येतात. तेव्हा ‘गाडी आत जाणार नाही, हाय-वेला उतरावे लागेल.’ असे सांगतात. स्वारगेट बसस्थानक सोडलेले असते. त्यामुळे अर्ध्यावर उतरूनही फायदा होत नसल्याने विचार करून प्रवासी ठिक आहे म्हणून नाईलाजाने साताºयात येतात; पण येथे आल्यावर त्यांना वाढेफाटा किंवा बॉम्बे रेस्टॉरंट चौकात उतरावेलागते.नातेवाइकांना घ्यावे लागते बोलावूनमहामार्गावर उतरल्यानंतर साताºयात किंवा घरी जाण्यासाठी नातेवाइकांना दुचाकी घेऊन बोलावून घ्यावे लागते. त्यानंतरच ते घरी जाऊ शकतात. परंतु तिकीट काढून मनस्ताप सहन करावा लागत असल्याने असंतोष व्यक्त होत आहे.