शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

गावाच्या उजेडासाठी झिजले वीजखांब!

By admin | Updated: July 26, 2015 00:02 IST

महावितरणचे धोक्याकडे दुर्लक्ष : वाई तालुक्यातील अनेक गावांमध्ये लोखंडी खांब गंजल्यामुळे धोकादायक स्थितीत उभे

संजीव वरे ल्ल वाई स्वत: अंधारात राहून इतरांना उजेड देऊन त्यांचं आयुष्य प्रकाशमान करणारे गावोगावचे वीजखांब आता म्हातारे होऊ लागले आहेत. ज्याच्या खांद्यावर बसून वीज गावात आली ते विजेचे खांब वर्षानुवर्षे ऊन-वारा-पाऊस अंगावर झेलत उभे आहेत. मात्र, त्यांचं आयुष्यही आता संपत आले असून वाई तालुक्यातील वयगाव येथे विजेचे नऊ लोखंडी खांब अक्षरश: कुजून मोडकळीस आले आहेत. गावाला उजेड देता-देता वीजखांब अक्षरश: झिजले आहेत. ही धोक्याची घंटा असून वीजखांबाच्या या दुखण्याकडं वीजवितरण कंपनीचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. वाई तालुक्यातील वयगाव या गावात १९७९ मध्ये वीज आली. त्यावेळी गावात लोखंडी वीजखांब रोवून वीजपुरवठ्याची सोय केली. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे सुमारे ३५ वर्षांपासून ते खांब गावाला उजेड देण्याचे काम करत आहेत. मात्र, वर्षानुवर्षे ऊन, वारा अन् पावसाचा मारा सहन करून लोखंडी खांबांना गंज चढला आहे. गावातील ९ लोखंडी वीजखांब गंजल्यामुळे झिजले आहेत. हे खांब लोकवस्तीत असून मोठ्या वादळवाऱ्यात कधीही जमीनदोस्त होऊ शकतात. तालुक्यातील अनेक गावातील वीजखांबांची दुरवस्था झाली आहे. वीजखांबांना गंज चढून ते मोडकळीस आले आहेत. महावितरण कंपनीने धोकादायक वीजखांब बदलावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. वायरमनच्याही जिवाला धोका लोखंडी वीजखांब वर्षानुवर्षे पावसात भिजल्यामुळे गंजले आहेत. परिणामी अनेक ठिकाणी खांबांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली आहे. अशा धोकादायक खांबावर दुरुस्तीसाठी चढणे जिवाशी खेळ आहे. जावळी तालुक्यातील आखाडे येथे शुक्रवारी तार ओढून घेण्यासाठी वीज तंत्रज्ञ खांबावर चढला असता, सिमेंटचा खांब तुटून झालेल्या दुर्घटनेत तंत्रज्ञाचा मृत्यू झाला होता. वीजखांबांच्या दुखण्याला उपचाराची गरज वाई तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये लोखंडी, सिमेंटचे वीजखांब धोकादायक स्थितीत उभे आहेत. अशा वीजखांबांचा सर्व्हे करून ते दुरुस्त करण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास वादळात दुर्घटना घडू शकते.