शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाई नगरपालिकेचा बहुमतावर अर्थसंकल्प मंजूर

By admin | Updated: February 26, 2016 00:48 IST

विरोधकांचा आरोप : अर्थसंकल्पात निधीचा महापूर; मात्र नियोजनाचा खडखडाट

वाई : येथील नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी माडंलेल्या विषयांना विरोधकांनी तीव्र विरोध करून प्रत्येक मुद्द्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावर सत्ताधारी, प्रशासन व लेखापाल यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने बोलती बंद झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले़ दरम्यान, या सभेत सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर अर्थसंकल्प मंजूर केला आहे. अर्थसंकल्पात निधीचा महापूर मात्र नियोजनाचा खडखडाट आहे, असा आरोप विरोधकांनी केला. वाई नगरपालिकेचा २०१६-१७ चा वार्षिक अर्थसंकल्प मंजुरीसाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते़ नगराध्यक्ष भूषण गायकवाड, उपनगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी आशा राऊत व लेखापाल प्रविणा ओसवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेच्या छ़ शिवाजी महाराज सभागृहात ही सभा पार पडली़ वाई नगरपालिकेतील सत्ताधारी तीर्थक्षेत्र आघाडीने सभागृहापुढे २७ कोटी २१ लाख ६१ हजार ३४० रुपयांचा अर्थसंकल्प ठेवला होता़ हा अर्थसंकल्प सत्ताधाऱ्यांना विरोधकांचा विरोध धुडकावून बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात यश आले़ कर्मचाऱ्यांचा राखीव वेतन निधी, निवृत्तीवेतन निधी, जल शौचकुप रूपांतर निधी, पाणीपुरवठा राखीव निधी, कर्ज निवारण राखीव निधी, सर्वसाधारण राखीव निधी, वृक्षसंवर्धन राखीव निधी, घसारा राखीव निधी, बुडीत राखीव निधी, या निधींच्या संदर्भात सत्ताधारी व पालिका प्रशासनाने जी आकडेवारी सभागृहापुढे मांडली होती. त्यासंदर्भात विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व प्रशासनातील सर्व अधिकारी यांना अनुत्तरीत केले. त्यामुळे त्यांची कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले़ कृष्णा नदीत पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध प्रकल्प उभारावेत, तसेच पालिकेची विश्वासहर्ता रसातळाला पोहोचली आहे़ यासारखे अनेक गंभीर आरोप नगसेवक सचिन फरांदे, महेंद्र धनवे यांनी केले. अर्थसंकल्पात अनेक विषयांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचाही आरोप करण्यात आला. चर्चेत नगरसेवक डॉ़ अमर जमदाडे, कैलास जमदाडे, दत्तात्रय खरात, सुभाष रोकडे, धनंजय मोरे, शोभा शिंदे, वर्षा शेवडे, सीमा नायकवडी, शर्मिला जाधव, पद्मा पिसाळ आदींनी सहभाग घेतला़ आरोग्य अधिकारी नारायण जाधव, राजन बागुल, राजेंद्र गायकवाड, दीपक गोंजारी आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)