शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वडूज :  कचरा डेपो स्थलांतरासाठी रास्ता रोको तासभर वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 17:44 IST

तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. कचरा डेपोचा स्थलांतरित प्रश्न सातत्याने ऐरणीवर राहिल्याने संतप्त नागरिक व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रास्ता रोको

ठळक मुद्देवडूजच्या आंदोलनात भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाºयांसह नागरिकांचा सहभाग

वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. कचरा डेपोचा स्थलांतरित प्रश्न सातत्याने ऐरणीवर राहिल्याने संतप्त नागरिक व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रास्ता रोको केला. आठवडा बाजारादिवशीच आंदोलन झाल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली. 

कचरा डेपोसंदर्भात आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांसह संबंधित विभागाला कचरा डेपो स्थलांतराबाबत निवेदन दिले होते. परंतु याबाबतीत गंभीर नसलेल्या प्रशासनाने डोळेझाक करत हा प्रश्न सोयीस्कररीत्या बाजूला ठेवला. वडूजनगरीच्या वसाहतीत झपाट्याने वाढ होत असली तरी नगरपंचायत याबाबतीत गंभीर नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

नागरीवस्ती झपाट्याने वाढत असल्याने कचºयाचीही वाढ तेवढ्या गतीने होत आहे. लक्षात घेता सद्य:स्थितीतील कचरा डेपोत कचºयाची होणारी भरमसाठ वाढ, त्या परिसरातील लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करीत आहे. कचराच्या दुर्गंधीबरोबरीनेच सातत्याने कचरा पेटविल्याने होणारे हवा प्रदूषण या सर्वच गोष्टींचा येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरत आहे. हा कचरा वसाहत परिसरातही दिसून येत आहे.

कचरा डेपो लगतच विविध समाज बांधवांच्या स्मशानभूमी असल्याने अंत्यसंस्कार करताना अडचणी येत आहेत. तरीही नगरपंचायत प्रशासन याबाबत विचाराधीन नाही, ही शोकांतिका ठरत आहे, असा नागरिकांमधून सूर निघत आहे. या संदर्भात स्वच्छता मंत्री, जिल्हाधिकारी, वडूज नगरपंचायत, पोलीस ठाणे आदींना निवेदन दिलेले होते.आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कचरा डेपो स्थलांतराबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे लक्षात येताच भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते व या परिसरातील नागरिकांनी वडूजमधील शेतकरी चौकात एक तास रास्ता रोको केला. 

स्वच्छ वडूजसाठीही प्रयत्न व्हावेत..सातारा जिल्हा स्वच्छतेबाबत देशात प्रथम क्रमांक मिळवला म्हणून एकीकडे आनंदोत्सव साजरा करताना दिसून येत आहे. दुसरीकडे हुतात्म्यांच्या भूमी व तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूजनगरीत कचरा निर्मूलनाबाबत नगरपंचायत प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ वडूजसाठीही प्रयत्न व्हावेत, अशी मागणी सध्या जोर धरू  लागली आहे.