शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वडूज आठ दिवस पाण्याविना!

By admin | Updated: March 31, 2016 00:09 IST

ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार : कामानिमित्त येणाऱ्यांचीही होतेय गैरसोय

वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरास येरळा तलावङ्कमधून पाणीपुरवठा होत असतो. सुमारे एकोणत्तीस हजार लोकवस्ती असलेल्या वडूज शहरात सर्वच प्रमुख शासकीय कार्यालये, दवाखाने आणि इतर सुविधा असणारे मुख्य केंद्रे आहेत. त्यामुळे तालुक्याच्या टोकावरून ये-जा करणाऱ्यांची नेहमीच वडूज परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने स्वाभाविकच पाणी जादा लागते. परंतु गेल्या आठ दिवसांपासून वडूज शहराचा पाणीपुरवठा बंद झाल्याने वडूजकरांसह ये-जा करणाऱ्यांचे पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे दृश्य पाहायाला मिळत आहे.वडूज शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर पाणी बचतीचे नव-नवीन फंडे सुरू झाले. नेहमी मोठ्या टपात पाणी साठा करून खळखळून धुणे धुणाऱ्या महिला आता छोट्या घमेल्यात पाणी घेऊन कपडे धुवत असल्याचे चित्र पाहायला मिळते. धुणे धुवून उर्वरित पाणी पूर्वी रस्त्यावर सडा मारण्यासाठी वापरले जायचे आता हे पाणी झाडांसाठी वापरले जात आहे. आठ दिवस पाणी न आल्याने वडूजकरांना पाण्याचे महत्त्व पटल्याने पाणी बचत कशी करावी हे अखेर समजले. बहुतांशी घरात व अन्य ठिकाणी इंधन विहिरी (बोअरवेल) असल्यामुळे पाण्याची टंचाई काही दिवस जाणवली नसली तरी इतर ठिकाणाहून पाणी घेण्यासाठी लोकांची होणारी वर्दळ पाहता बोअरधारकांनाही पाण्याचे महत्त्व आपसूकच कळले.येरळवाडी येथील येरळा तलावातून वडूजची प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना मधून वडूज शहराला पाणीपुरवठा होतो. वडूज शहराची कुटुंब संख्या ३७०० असून, प्रशासनाकडे नोंद असलेली लोकसंख्या १७ हजार ६३४ आहे. प्रत्यक्षात ही लोकसंख्या २९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. या लोकसंख्येचा दैनदिन सुमारे १० लाख लिटर पाणी लागते. तालुक्यात कितीही मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई झाली तरी वडूजला पाणीपुरवठा सुरळीत होता. यापूर्वी सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून ग्रामपंचायत सदस्य स्वत: लक्ष घालून कार्यरत आहेत. मात्र यावेळी आठवडा उलटला तरी या विषयाकडे डोळेझाक झाली. याला ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. प्रारंभी येरळा तलाव जवळील वीज जोड असलेली केबल खराब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ती केबल तत्काळ दुरुस्त करण्यासाठी दोन दिवस गेले. परंतु पुन्हा मोटारीचा स्टॉटर मधील कार्ड जळाल्याचे लक्षात आले. या नळपाणीपुरवठा योजेनसाठी दुसरी पर्यायी यंत्रणा सज्ज असणे आवश्यक असताना दुसरी पर्यायी योजना बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. ही सर्व दुरुस्ती करण्यासाठी काही कर्मचारी सांगलीकडे रवाना झाल्याच्या वृत्ताला ग्रामविस्तार अधिकारी काझी यांनी दुजोरा दिला. या नळपाणीपुरवठा बंदच्या काळात वडूजमधील नागरिकांना पाण्याचे महत्त्व जरी तात्पुरते कळाले असले तरी वडूज परिसरात पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत असतो हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही.नेहमी पाणी आले की रस्त्यावर सडा, पाणी भरून झाले की नळाला कॉक न लावता ते पाणी गटारात सोडून देणे अशा प्रवृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)४वडूज शहराची व्याप्ती पाहता आणि नेहमीच ऐन उन्हाळ्यात बंद पडणारी ही जलदायी योजना, स्वच्छ पाण्यासाठी टाकण्यात येणारे घटक आणि कर्मचाऱ्यांची शासकीय पातळीवर नि:पक्षपाती चौकशी व्हावी, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य विवेक येवले यांनी केली आहे. ४काही तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस शहरातील पाणीपुरवठा खंडित झालेला होता. तो लवकरच सुरू होईल यापुढे उन्हाळ्यात वडूज शहराला पाणी कमी पडणार नाही यासाठी सुद्धा ग्रामपंचायतीने भरीव काम केले आहे. तरीसुद्धा नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन ही ग्रामविस्तार अधिकारी चाँद काझी यांनी केले.