शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मतदार बँकेच्या रांगेत अन् उमेदवार मतदारांच्या दारात..!

By admin | Updated: November 18, 2016 23:10 IST

कोरेगावातील स्थिती : नोटा बंदीच्या निर्णयाचा फटका; छोट्या प्रभागामुळे उमेदवारांच्या सतत भेटी

कोरेगाव : केंद्र सरकारने नोटा बंदीचा निर्णय अचानक घेतल्याने सर्वसामान्यांचे धाबे दणाणले आहेत. नोटा बदलण्यासाठी राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांबाहेर लोकांनी रांगा लावलेल्या आहेत. ऐन निवडणुकांच्या मोसमात हा बदल झाल्याने नेतेमंडळींसह उमेदवारांची चांगलीच गोची झालेली आहे. नगरपंचायत निवडणुकीत छोटे प्रभाग असल्याने उमेदवार सातत्याने मतदारांच्या भेटी घेत असला तरी सध्या मतदार बँकेच्या रांगेत आणि उमेदवार मतदारांच्या दारात असे काहीसे चित्र पाहावयास मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर व्यापारी पेठ म्हणून कोरेगावचा नावलौकिक आहे. शहरातील ग्रामपंचायतीचे आता नगरपंचायतीत रूपांतर झालेले असून, नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आगामी आठवड्यात होत आहे. नगरविकास विभागाने शहरातील प्रभागांची विचित्र पद्धतीने आणि तांत्रिकदृष्ट्या रचना केल्याने मतदारांबरोबरच उमेदवारांना अवघड होऊन गेले आहे. समानता कोठेही नसल्याने काही प्रभागांत शेकड्यात तर काही प्रभागांत हजारांमध्ये मतदार आहेत. भौगोलिक असमानता असल्याने एकाच प्रभागात फिरताना दोन प्रभाग ओलांडावे लागत आहेत. ऐन दिवाळीच्या धामधुमीत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर उमेदवारांनी थेट मतदारांवर लक्ष केंद्रित करत त्यांची दिवाळी चांगली केली. मिठाईबरोबरच सुकामेव्याचा पाऊस पडल्याने आणि अनेकांना वस्तुरूपी दिवाळी गिफ्ट मिळाल्याने मतदार राजा चांगलाच सुखावला होता. त्यानंतर अवघ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट चलनातून बाद केल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वसामान्यांची बोलतीच बंद झालेली आहे. सरकारने आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटा बदलताना काही जाचक अटी घातल्या असल्याने लोकांना हातातील कामधंदे सोडून केवळ नोटा बदलण्यासाठी बँकांच्या दारात तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. ऐन निवडणुकांच्या मोसमामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेणाऱ्या नेतेमंडळींसह उमेदवारांची मात्र चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)