शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

विशाल पाटील गटाचा मोहनराव कदमांना पाठिंबा

By admin | Updated: November 15, 2016 23:34 IST

विधानपरिषद निवडणूक : जयंत पाटील शत्रू, तर कदमांशी वाद कायम असल्याची भूमिका

सांगली : जयंत पाटील हे आमचे क्रमांक एकचे शत्रू आहेत. त्यांना विरोध म्हणून, तसेच पक्षीय आदेशाचा मान राखून आम्ही विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मोहनराव कदम यांना पाठिंबा देत आहोत, अशी घोषणा बंडखोर गटाचे नेते विशाल पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, कदम गटाबद्दलची आमची नाराजी आणि त्यांच्याशी असलेला वाद संपलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाटील म्हणाले की, मोहनराव कदम यांना उमेदवारी दिली जाऊ नये, अशी आमची मागणी होती. महापालिकेत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने कारभार केला, त्याच गटाचा उमेदवार निवडून येऊ नये, अशी आमची भूमिका होती. त्यामुळेच त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी आमची चर्चा झाली. कदम गटाबद्दलची नाराजी आम्ही त्यांच्यासमोरही मांडली आहे. तरीही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हा वाद तूर्त बाजूला ठेवून उमेदवारास पाठिंबा देण्याची सूचना केली. त्यांच्या या सूचनेप्रमाणे आम्ही कदम यांना पाठिंबा देत आहोत. आमची त्यांच्याबद्दलची नाराजी कायम आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे आमचे क्रमांक १ चे शत्रू आहेत. त्यांना विरोध म्हणूनही आम्ही पाठिंबा दिलेला आहे. कदम गट यापुढे जयंत पाटील यांच्या राजकारणात सहभागी होणार नाही, या गोष्टीवर आम्ही पुन्हा विश्वास ठेवत आहोत. त्यांनी जयंतरावांशी कोणतीही ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ नाही, हे जाहीर करावे. अशोक चव्हाण यांच्यासोबतच्या बैठकीत आमच्यातील वादावर पडदा पडलेला नाही. केवळ विधानपरिषद निवडणुकीतील पाठिंब्याचा विषय होता. तो आम्ही मान्य केला आहे. निवडणुकीनंतर चव्हाण यांच्याकडून पुन्हा अंतर्गत वादाच्या विषयांवर चर्चा होणार आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) जिल्हाध्यक्षपदाची चर्चा जिल्हाध्यक्षपद गेली २५ वर्षे एकाच तालुक्यातील एकाच गटाकडे असल्याबाबतची तक्रार आम्ही केली आहे. दुसऱ्याला संधी देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत विचार करण्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले आहे, असे विशाल पाटील म्हणाले. जयंतरावांचे कुजके राजकारण संपूर्ण जिल्ह्यात जयंत पाटील कुजके राजकारण करीत आहेत. त्यांच्या या राजकारणाविरोधात आम्ही आघाडी उघडली आहे. त्यांचे हे राजकारण संपविण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. त्यांनीच ‘पॅकेज संस्कृती’ सांगलीत आणली. प्रत्येक संस्थेत आम्ही त्यांना विरोध केलेला आहे. दुसऱ्याच्या संस्थेत अतिक्रमण करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे, असे विशाल पाटील म्हणाले. शेखर माने गैरहजर : कदम यांना पाठिंबा जाहीर करताना विशाल पाटील यांच्यासह उपमहापौर विजय घाडगे, स्वाभिमानी आघाडीचे शिवराज बोळाज, तसेच दहा नगरसेवक उपस्थित होते. मात्र, बंडखोर उमेदवार शेखर माने गैरहजर होते. त्यांच्या अनुपस्थितीबद्दल विशाल पाटील म्हणाले की, पाठिंब्याबाबत उमेदवार म्हणून त्यांना तांत्रिक अडचण आहे. तरीसुद्धा आमची भूमिका जाहीर करताना त्यांच्याशी चर्चा झालेलीच आहे. पाठिंब्याचा निर्णय सर्वानुमते झालेला आहे.