शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी फलकयुद्ध अन् जेवणावळ्यांना ऊत!

By admin | Updated: October 29, 2015 00:14 IST

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला : जिल्ह्यात १0४ ग्रामपंचायतींचा प्रचार टिपेला; नेतेमंडळींसाठी निवडणूक प्रतिष्ठेची

सातारा : जिल्ह्यातील १0४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रचार टिपेला पोहोचला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार, नेतेमंडळींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असून गावागावांत फलकयुध्द सुरु आहे. जेवणावळ्यांनाही ऊत आला असून ढाबे चालकांसाठी सुगीचे दिवस आले आहेत. जिल्ह्यातील १७१ ग्रामपंचायतींपैकी ६७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर सातारा तालुक्यातल्या नांदगावची निवडणूक रद्द झाली असून उर्वरित गावांमध्ये धूमशान सुरु झाले आहे. सातारा तालुक्यातील ९२ पैकी ६७ ग्रामपंचायती बिनविरोध झाली असून कोडोली, अंबवडे बुद्रूक, चिंचणेर वंदन, गोवे, नागठाणे या गावांत टस्सल लढत पाहायला मिळत आहे. बहुतांश गावे सातारा, कऱ्हाड, कोरेगाव या तीन तालुक्यांत विभागली गेली असली तरीही आमदार मंडळींनी यात विशेष लक्ष घातलेले दिसत नाही. स्थानिक पातळीवरील गटा-तटांत लढाया सुरु असून कोण वरचढ ठरतो? याचे आडाखे बांधले जात आहेत. कोरेगाव तालुक्यातल्या ६ पैकी बोधेवाडी व देऊर या दोन ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात आमदार शशिकांत शिंदे यांना यश आले आहे. उर्वरित होलेवाडी, पेठकिन्हई, वाठार बिनविरोध ग्रामपंचायतींमध्ये सातारा तालुक्यातील आंबळे, अंगापूर तर्फ तारगाव, बनघर, जोतिबाचीवाडी, खडगाव, कोंडवे, कुस बु., मापारवाडी, पाटेघर, वासोळे, अगुंडेवाडी, चाळकेवाडी, धनगरवाडी (निगडी), धनवडेवाडी, कूस खुर्द, निगुडमाळ, पिलाणीवाडी, राकुसलेवाडी, रामकृष्णनगर, भैरवगड. वाई तालुक्यातील गोळेगाव, सुलतानपूर. पाटण तालुक्यातील गुढे, अंबेघर तर्फ मरळी, डांगिष्टेवाडी, गहनबी, कारवट, पाचपुतेवाडी. महाबळेश्वरमधील कुंभरोशी, आमशी, पाली तर्फ आटेगाव, सोनाट, वानवली तर्फ सोळशी, वारसोळीदेव, वेळापूर, भीमनगर (पुनर्वसन), दाभदाभेकर, अकल्पे, बिरमणी, चिखली, घावरी, नाकिंदा, कोरेगावातील देऊर. कऱ्हाड तालुक्यातील जखिणवाडी. जावळीतील अपटी, दापवडी, धनकवडी, धोंडेवाडी, दिवदेव, जरेवाडी, केडांबे, केसकरवाडी, मोहाट, मोरावळे, शेंबडी, बाहुले या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.पेठकिन्हई, वाठार किरोली, होलेवाडी, कठापूर (ता. कोरेगाव), अखेगणी, भालेघर, दुदुस्करवाडी, काटवली, महामुलकरवाडी, शेते, पवारवाडी, काळोशी (ता. जावळी), उंब्रज, कोपर्डे हवेली, शिरगाव, तांबवे (ता. कऱ्हाड), मेंढेघर, साखरी, नेचल, आंबळे, मोरेवाडी (ता. पाटण), केंजळ, जांभ, ओझर्डे, वाघजाईवाडी (वाई), कुमठे, उंबरी, चतूरबेट, दानवली, पारपार (महाबळेश्वर), वडगाव, धनगरवाडी, मोर्वे (ता. खंडाळा), वेटणे, पुनवडी (ता. खटाव), इंजबाब, रांजणी, देवापूर, वारुगड, शिंगणापूर (ता. माण), शेरेचीवाडी, पिराचीवाडी (ता. फलटण) या ग्रामपंचायतींत धूमशान होणार असून, काही ठिकाणी दुरंगी तर बहुतांश ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढत होणार आहे. (प्रतिनिधी)चिन्हे लक्षात कशी ठेवायची हा प्रश्ननिवडणूक लागलेल्या मोठ्या गावांमध्ये दुरंगी, तिरंगी लढत होत आहेत. काँगे्रस, राष्टवादीमधील पारंपरिक लढतीही जागोजागी होणार असल्याचे चित्र आहेत. ज्या गावांत उमेदवारांची संख्या मोठी आहे, तिथे चिन्हांची संख्याही जास्त आहे. मात्र ही चिन्हे लक्षात रहावीत, यासाठी योजनाबध्द ‘प्रचार’ सुरु आहे. आपले चिन्ह घरा-घरांत पोहोचावे, यासाठी काही उमेदवारांनी हात ढिले सोडले आहेत, तर काहींनी आपल्या चिन्हाची वस्तूच वॉर्डात पोहोचवली आहे. कपबशी, काठ्या, केरसुन्या, घड्याळे, टेबल, खुर्च्या, टीव्ही, खराटा, बॅट, बॉल अशी चिन्हे निवडणूक लागलेल्या गावांमध्ये घरा-घरांत पाहायला मिळत आहेत. या गावांत होणार तोडीस-तोड लढत तासगाव, कोडोली, अतित, चिंचणेर वंदन, नागठाणे, गोवे, पेठकिन्हई, वाठार किरोली, कठापूर, काळोशी, पवारवाडी, शेते, उंब्रज, कोपर्डे हवेली, तांबवे, केंजळ, जांभ, ओझर्डे, मोर्वे, वडगाव, धनगरवाडी, शेरेचीवाडी, पिराचीवाडी, वेटणे, पुनवडी, इंजबाब, रांजणी, देवापूर, वारुगड, शिंगणापूर या गावांमध्ये तोडीस-तोड लढती पाहायला मिळत आहेत. काँगे्रस-राष्ट्रवादीतील पारंपरिक लढतीत आता शिवसेना-भाजपने आपले बळ आजमावण्याचा प्रयत्न जागोजागी केला आहे. राज्यातील सत्तेच्या आधारावर जिल्हा काबीज करण्याचे काहींचे धोरण आहे.