शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘जमिनीवरचे’ नाना-मकरंद गावकऱ्यांना भावले!

By admin | Updated: December 17, 2015 22:59 IST

‘नाम’कडून जलसंधारणाची पाहणी : गुढ्या उभारून स्वागत; मिंधेपण टाळून स्वयंभू बनण्याचा ग्रामस्थांना संदेश

वाठार स्टेशन : मिंधे झाल्यामुळं तुमचा बोलण्याचा अधिकार नाहिसा होतो. स्वयंभू बनण्याचं सामर्थ्य ठेवा. सगळं जग उजळून टाकण्याचं सामर्थ्य आपल्याकडे नसलं तरी त्यातला एक भाग जरी स्वयंपूर्ण केला तरी ते पुरेसं होईल... हिरवा तीन बटनांचा गावरान शर्ट, लेंगा, खांद्यावर पांढरं उपरणं. पायात कातडी चप्पल. काळ्या-पांढऱ्या दाढीसह एरवी ‘डॅशिंग’ दिसणाऱ्या चेहऱ्यावर गोल चष्म्यामुळं आलेला सौम्यपणा आणि ओठातून बाहेर पडणारे अन्नदात्या शेतकऱ्याविषयीचे कृतज्ञतेचे उद््गार... अभिनेते नाना पाटेकर यांनी महाराष्ट्राचा फेव्हरिट मकरंद अनासपुरे यांच्यासमवेत खटाव आणि कोरेगाव तालुक्यातल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना शाबासकी देताना परावलंबित्वाचं जोखड फेकून देण्याचा मौलिक सल्लाही दिला. नलवडेवाडीकरांनी नाना आणि मकरंदचे गुढ्या उभारून स्वागत केले. ‘गावाला पुढे नेण्यासाठी एकोपा महत्त्वाचा आहे; पण तो हरवत चाललाय. गाव एक कुटुंब म्हणून वावरायला लागलं की, विकासाला वेग येतो. ही प्रक्रिया अव्याहत सुरू राहण्यासाठी एकदिलाने काम करा. नाम फाउंडेशन आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील,’ अशी ग्वाही पाटेकर यांनी नलवडेवाडी ग्रामस्थांना दिली.यावेळी नूतन ग्रामपंचायत कार्यालय व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचेही उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, नाम संस्थेचे विश्वस्त राजीव सावंत, डॉ. अविनाश पोळ, प्रांताधिकारी अजय पवार, तहसीलदार अर्चना तांबे, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, रवींद्र रांजणे, क्रांती बोराटे, उपविभागीय कृषी अधिकारी भुजबळ, सरपंच सुषमा नलवडे यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)नाना उवाच...मी कोणत्याही पक्षाचा नाही; पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा कुणी असेल तर त्याच्यापुढे मी नक्की हात जोडेन.लोकप्रतिनिधींनी काय करावं याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्याला काय योग्य वाटतं ते करत राहावं.राजकीय पक्षांच्या विरोधात बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा कृती सुरू करणं महत्त्वाचं. आपल्याला आयुष्यात पाप करायला वेळच मिळू नये एवढं पुण्य करावं. कोणत्याही धर्मात न अडकता!रस्त्यावर आल्यावर आपण या देशाचे सुजाण नागरिक आहोत, याचं भान हवं.नानांचा गावकऱ्यांना शब्द...‘जाखणगावला पुन्हा येईन’खटाव : तालुक्यातील जाखणगावने लोकसहभाग व शासानाच्या सहकार्यातून जलक्रांती केली आहे. येथील जलसंधारणाचे काम पाहण्यासाठी आणि ठिबक संचाची भेट देण्यासाठी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे आले. मात्र, कौटुंबिक अडचणीमुळे नाना पाटेकर यांनी फक्त एकाच शेतात ठिबकचे उद्घाटन केले नाम फाउंडेशनने ५0 एकर क्षेत्रात ५0 शेतकऱ्यांना या ठिबक संचाचे वाटप करुन गावाला सहकार्य केले आहे. कौटुंबिक अडचणीमुळे दौरा आटोपता घ्यावा लागत असल्याने नानांनी दिलगिरी व्यक्त केली. इतका वेळ आपली वाट पहात उभ्या असलेल्या लोकांशी नाना काही वेळ बोलले अन् पुन्हा येण्याचा शब्द देऊन ते मार्गस्थ झाले.प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक‘नाम फाउंडेशनला प्रशासकीय अधिकारी पुढे येऊन मदत करत नाहीत; पण येथे वेगळा अनुभव आला. एवढे अधिकारी उपस्थित आहेत, हे पाहून आनंद वाटला. असे सामाजिक कार्यासाठी झोकून देणारे अधिकारी असल्यावर विकासप्रक्रिया थांबू शकत नाही. अंगावरील इस्त्रीची कपडे आपुलकी कमी करतात. इस्त्री कपड्याला नाही मनाला असायला हवी,’ अशा शब्दांत नाना पाटेकर यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले.नाम फाउंडेशन हे नाना किंवा मकरंदची खासगी मालमत्ता नाही. ही संस्था चालवायला आपल्याला दुसरी पिढी उभी करायची आहे. आम्ही फक्त पोस्टमन आहोत. - नाना पाटेकर आज गावागावाचे उकिरडे झाले आहेत ते केवळ राजकीय वैमनस्यामुळेच. त्यामुळे यापुढे निवडणुका सण म्हणून साजरा करावा का, असा प्रश्न पडतो. - मकरंद अनासपुरे