शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी एल्गार... जय मल्हार!

By admin | Updated: March 13, 2017 22:53 IST

मल्हार क्रांतीसाठी रणरागिणीही सज्ज : धनगर समाजाच्या बैठका अन् भेटींचा धडाका; दहिवडीतील मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात

सातारा : धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी दहिवडी येथे दि. १६ रोजी मल्हार क्रांतीच्या झेंड्याखाली महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी माता अहिल्यादेवी रणरागिणी सेना कार्यरत झाली आहे. या सेनेच्या माध्यमातून माण तालुक्यातील विविध गावे, वाडी-वस्त्यांवर बैठका घेण्यात येत असून, त्याद्वारे महिलांना मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.बैठकांमध्ये सहभागी होणाऱ्या गाव अणि वाडी-वस्तीतील महिला दि. १६ च्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. आजअखेर आरक्षण मागणीसाठीचे २० हजारांच्या आसपास अर्ज माण तालुक्यातील धनगर बांधवांनी भरल्याची माहिती संयोजकांनी दिली. ‘ना कोणत्या नेत्याचा, ना कोणत्या पक्षाचा, मोर्चा फक्त धनगर समाजाचा’ अशा घोषणा देत धनगर बांधव सक्रिय झाल्याने निघणाऱ्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.बारामती येथील धनगर समाजाच्या मोर्चादरम्यान तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यास १५ दिवसांत आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचा फडणवीस यांना विसर पडला आहे. दिलेल्या आश्वासनाचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मरण करून देण्यासाठी मल्हार क्रांतीच्या झेंड्याखाली दहिवडी येथे १६ मार्च रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात आपलाही सहभाग असावा, यासाठी महिला आक्रमक झाल्या असून, माता अहिल्यादेवी रणरागिणी सेनेच्या माध्यमातून महिलांनी गावे आणि वाडी-वस्त्यांवर बैठकांचा धडाका लावला आहे. बैठकांदरम्यान गाव आणि वाडी-वस्तीतील महिला चूल बंद ठेवत दि. १६ रोजी मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. ‘ना कोणत्या नेत्याचा ना कोणत्या पक्षाचा मोर्चा फक्त धनगरांचा’ या संकल्पनेला महिला वर्गातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.‘आता नाय तर कधीच नाय’ असे बोलून दाखवत महिला मोर्चासाठी आक्रमक झाल्या आहेत. मोर्चात सहभागी होण्यासाठी घरातील व इतर कामे अगोदरच आटोपून घेण्यात सध्या महिलावर्ग गुंतला असल्याचे चित्र माण तालुक्याच्या विविध गावे आणि वाडी-वस्तीत दिसून येत आहे. (प्रतिनिधी)