ढेबेवाडी :
ढेबेवाडी भागाचे प्रतिनिधित्व करत असताना गाव तेथे विकासकाम देण्याचा मी प्रयत्न केला असून, अनेक विकासकामे मार्गी लावलेली आहेत. जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
बनपुरी ग्रामपंचायतीअंतर्गत कडववाडी येथील स्मशानभूमी शेड व येथील हनुमान वाॅर्ड येथे सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार
पडले. यावेळी ते बोलत होते. बनपुरी सरपंच नर्मदा कुंभार, उपसरपंच अशोक जगदाळे, शिवाजीराव पवार, शिवाजीराव जगदाळे आदी उपस्थित होते. मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत. बनपुरी ग्रामपंचायतीअंतर्गत कडववाडी येथे वर्षानुवर्षे येथील ग्रामस्थांना अंत्यविधी उघड्यावर करावा लागत होता. पावसाळ्यामध्ये तर ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर ग्रामस्थांनी सदस्य रमेश पाटील यांच्याकडे मागणी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून स्मशानभूमी शेड मंजूर करण्यात आले. अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे. त्याचबरोबर हनुमान वाॅर्ड येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार सभामंडपाचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मंजूर करण्यात आले असून, कामाचे भूमिपूजन रमेश पाटील यांच्या हस्ते पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम, अटी-शर्तींनुसार अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.