शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

एक गाव एक गणपतीला ५२२ मंडळांची साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:30 IST

सातारा : गटबाजी थांबली की वाद टळतात. यासाठी गटा-तटाचे निमित्तच राहू नये व गावाने एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा, या पोलिसांच्या आवाहनाला साद देत तब्बल ५२२ मंडळांनी एक गाव एक गणपती संकल्पना अंमलात आणली आहे. विशेष म्हणजे ही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक ७४ गावांचा पुढाकार आहे.गावात उत्सवात ...

सातारा : गटबाजी थांबली की वाद टळतात. यासाठी गटा-तटाचे निमित्तच राहू नये व गावाने एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा, या पोलिसांच्या आवाहनाला साद देत तब्बल ५२२ मंडळांनी एक गाव एक गणपती संकल्पना अंमलात आणली आहे. विशेष म्हणजे ही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक ७४ गावांचा पुढाकार आहे.गावात उत्सवात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांच्या पुढाकाराने एक गाव एक गणपती ही संकल्पना गेल्या आठ-दहा वर्षांपासून अधिक बळ धरत आहेत. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी यंदापासून यावर अधिक भर दिल्याने ही संकल्पना चांगलेच मूळ धरत गावागावात एकोपा निर्माण करण्याच्या कामाला चांगलीच गती मिळाली आहे. विशेष म्हणजे उणेदुणे व मंडळातील स्पर्धा बाजूला ठेवत ग्रामस्थांचा सहभाग लक्षणीय ठरला आहे.जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गणेश मंडळांच्या बैठका घेतला. मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत समन्वय साधत एक गाव एक गणपती या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार तब्बल ५२२ गावांनी प्रतिसाद दिला आहे.विशेष म्हणजे सर्वाधिक लोकसंख्येची गावे देखील सलग दुसऱ्या वर्षी एकोप्याने सहभागी होत आहेत. आता ज्या गावांमध्ये एकच गणपती आहे, अशा गावात गणेशोत्सवाच्या निमित्ताने दारूबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, महिला सक्षमीकरण, आरोग्य अशा विविध विषयांची जनजागृती होत आहे. बालभोजन, कीर्तनाचे कार्यक्रम व विविध स्पर्धाचे आयोजन होत आहेत. इतर खर्चाला फाटा देत गावभोजनावर खर्च केला जात आहे.पोलीस ठाणेनिहायमंडळांची संख्यासातारा शहर-१, सातारा तालुका-४१, बोरगाव-१७, कºहाड ग्रामीण-३४, उंब्रज-२५, वाई-३३, महाबळेश्वर-१६, पाचगणी-१४, मेढा-७४, भुर्इंज-२५, कोरेगाव-१२ पुसेगाव-२४, रहिमतपूर-१०, वाठार-२२, वडूज-१२, दहिवडी-२३, म्हसवड-१६, औंध-७, फलटण शहर-१, फलटण ग्रामीण-६, लोणंद-१८, खंडाळा-१०, शिरवळ-१३, पाटण-२६, कोयनानगर-१४, ढेबेवाडी-२५एक मंडळ, एक पोलीस कर्मचारीसातारा जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, एक पोलीस कर्मचारी ही आगळी-वेगळी संकल्पना राबविण्यात आली आहे. हे पोलीस कर्मचारी पोलीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणार असून, गणेशोत्सव शांततेत पार पडण्यास मदत होणार आहे.गणराया अ‍ॅवॉर्ड स्पर्धा पुन्हा सुरूगेल्या काही वर्षांपासून सातारा जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या गणराया अ‍ॅवॉर्ड स्पर्धेत खंड पडला होता. मात्र, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ही स्पर्धा पुन्हा सुरू करून गणेश मंडळांच्या माध्यमातून विधायक उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.