शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

सत्तासंघर्षाच्या लढाईत गावनेते मग्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

खंडाळा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण खंडाळा तालुक्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी गावोगावी विविध पक्षीय ...

खंडाळा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण खंडाळा तालुक्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी गावोगावी विविध पक्षीय पॅनेलअंतर्गत लढती होत आहेत. बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध कुठे भाजपा, काँग्रेस व इतर विरोधी पक्षांचे पॅनेल दंड थोपटून उभे ठाकले आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील गावनेते सत्तासंघर्षाच्या राजकारणात मग्न आहेत.

खंडाळा तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजला होता. त्यापैकी सात ग्रामपंचायतींसह १३१ जागा बिनविरोध झाल्याने ५० ग्रामपंचायतींत ३२० जागांसाठी लढती होत आहेत. ६९८ उमेदवार मैदानात उतरले आहेत. तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर आजवर राष्ट्रवादी काँग्रेसने प्राबल्य राखले आहे. परंतु गत जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. गावोगावी राष्ट्रवादीने पुन्हा बळकटी दिली असली तरी, या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीविरोधात विरोधी पक्षही सक्षम झाले आहेत. वास्तविक, आमदार मकरंद पाटील यांच्या वैयक्तिक जनसंपर्कामुळे विधानसभा निवडणुकीत विरोधी प्रभाव जाणवला नसला तरी, ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक गटबाजीमुळे ते दिसून येण्याची शक्यता आहे. त्यातच तालुक्यातील जवळपास सर्वच ठिकाणच्या निवडणुका होत असल्याने गावनेते सक्रिय झाले आहेत.

तालुक्यातील भादे, अंदोरी, अहिरे, पारगाव, खेड बुद्रुक, पाडळी, विंग, बावडा, शिवाजीनगर, नायगाव, जवळे, शिंदेवाडी, कवठे, पिंपरे बुद्रुक या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीच्या लढती होण्याची चिन्हे आहेत, तर काही ग्रामपंचायतींमध्ये अंतर्गत मतभेदामुळे तिहेरी पॅनेल लढत देत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय घडामोडी झाल्या. स्थानिक काँग्रेसच्या मोठ्या गटाने भाजपाला साथ दिली. माजी आमदार मदन भोसले यांच्या ताकदीमुळे मुळातच वाढत चाललेल्या भाजपाला आणखी बळ मिळाले. त्यामुळे हाच गट ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात पुढे सरसावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधात ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधक चांगलं बाळसं धरण्याची शक्यता आहे. त्यातच अनेक गावांमध्ये राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटांनी एकमेकांविरुध्द दंड थोपटल्याने तेथील लढतीकडे लक्ष लागले आहे, तर ग्रामपंचायतीच्या निमित्ताने गटा-तटात चालणाऱ्या राजकारणाने घरा-घरात शिरकाव केला आहे. त्यामुळे घरा-घरात राजकीय वातावरण ढवळून निघणार हे निश्चित आहे.

खंडाळा तालुक्यात मध्यंतरीच्या काळात वंचित बहुजन आघाडीने उभारी घेतली होती. बहुतांशी गावांत त्याच्या शाखाही उघडण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत विविध पक्षांच्या स्थानिक आघाडीत वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांना संधी दिली आहे. मात्र, या आघाडीला स्वतंत्रपणे पॅनेल उभे करता आले नाही.

विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीनंतर काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत पक्षाचे असणारे पॅनेल काही गावे वगळता कोठेही दिसून येत नाहीत. त्यामुळे हा पक्ष पुन्हा उभारी घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. याउलट गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू आणखी मजबूत करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी धावपळ करताना दिसत आहेत. मात्र, नक्की बाजी कोण मारणार, हे जनतेचा कौल आल्यानंतरच कळणार आहे.

चौकट..

बिनविरोध सत्ता....

तालुक्यातील सात गावे बिनविरोध झाली असून, यामध्ये पळशी, कराडवाडी, वाण्याचीवाडी, लिंबाचीवाडी, हरळी, कान्हवडी, घाडगेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पळशी गाव मोठे असले तरी बिनविरोध करून गावाची एकी राखली गेली. तसेच घाडगेवाडी गावाने सलग तीस वर्षे बिनविरोध निवडणुकीचा डंका वाजविला. भादवडे गावाने बिनविरोधचा प्रयत्न करूनही एका जागेची माघार झाली नसल्याने, तेथे लढत होत आहे. तसेच राजकीय संघर्षानंतर हरळी व कराडवाडी गाव एकत्रित झाले आहे.

........................

खंडाळा - ग्रामपंचायत वार्तापत्र