शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विजय थोरात सातारा पालिकेचे नवे मुख्याधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST

सातारा : सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांची पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी पदोन्नतीने बदली झाली आहे. तर भोरचे मुख्याधिकारी ...

सातारा : सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांची पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी पदोन्नतीने बदली झाली आहे. तर भोरचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांची सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी वर्णी लागली आहे. त्यांनी यापूर्वी शिरूर, दौंड व भोर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम केले असून, आता सातारा पालिकेची सूत्रे त्यांच्या हाती सोपविण्यात आली आहेत.

खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी प्रशासकीय कामकाजाचा उत्तम समन्वय असणारे अभिजित बापट यांची सोलापूर महापालिकेतून साताऱ्यात दि. १२ ऑगस्ट २०२० रोजी मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती. सोलापूर उपायुक्तपदाची जबाबदारी नाकारणाऱ्या अभिजित बापट यांना साताऱ्यात आणण्यासाठी मोठी राजकीय मोर्चेबांधणी झाल्याने तत्कालीन मुख्याधिकारी रंजना गगे यांना पुणे महानगरपालिकेत बदलून जावे लागले. कोरोनाचा संक्रमणकाळ, प्रशासकीय कामांना गती देण्याचा प्रयत्न, नगरोत्थानच्या निधीसाठी विकासकामांचे नवीन प्रस्ताव सुरू असताना मुख्याधिकारी अभिजित बापट यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने वर्णी लागल्याचा लेखी आदेश नगरविकास विभागाला शुक्रवारी उशिरा प्राप्त झाला आहे. संबंधितांना तत्काळ कार्यमुक्त करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

अभिजित बापट यांनी २०१२ ते १६ यादरम्यान जिल्हा प्रकल्प संचालक व सातारा पालिका मुख्याधिकारी अशी सलग सेवा बजाविली. साताऱ्याच्या विविध प्रश्नांचा त्यांचा सखोल अभ्यास होता, मात्र साताऱ्यात रुळण्यापूर्वीच त्यांची रवानगी पुण्याला झाली.

बापट यांची बदली झाल्याने भोरचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांच्याकडे सातारा पालिकेची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांना सांभाळून घेणारा व प्रशासनावर वचक असणारा अधिकारी म्हणून थोरात यांची ओळख आहे. त्यांनी यापूर्वी शिरूर, दौंड व भोर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे. सातारा पालिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय ठरली आहे. असे असले तरी डॉ. विजयकुमार थोरात यांच्या अनुभवाचा सातारा पालिकेला कितपत फायदा होतो हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.