शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

कास पठारावर विविधरंगी फुलांचे दर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST

सीतेची आसवे : सह्याद्री पठारावरच्या गवतात दडून बसलेली ही वनस्पती गवताबरोबर वाढते. अचानकपणे सप्टेंबरमध्ये फुले दिसून येतात. ही फुले ...

सीतेची आसवे : सह्याद्री पठारावरच्या गवतात दडून बसलेली ही वनस्पती गवताबरोबर वाढते. अचानकपणे सप्टेंबरमध्ये फुले दिसून येतात. ही फुले अतिशय सुवासिक व सुंदर असतात. निळसर रंगाचे फूल त्यावर पांढऱ्या रंगाचा ठिपका असतो. ही वनस्पती फुलांच्या सुवासाने कीटकांना आकर्षित करते.

तेरडा :

सह्याद्रीच्या रांगांत अनेक महत्त्वाच्या भागात सप्टेंबर म्हणजेच गौरी-गणपती सणाच्या आसपास ही वनस्पती उगवते. हिला तेरडा किंवा गौरीची फुले म्हणतात. ज्या भागात पावसाचे प्रमाण जास्त, वारा जास्त, हवा थंड या सर्व बाबी आढळत असल्यामुळे हा तेरडा जास्त उंच वाढत नाही, असा तो सडा भागातील लावी जातीचा जांभळा तेरडा आहे. याचा पंधरा ते वीस दिवस दिनक्रम चालू राहतो. जांभळ्या तेरड्याने पठार व इतर सडे उठून दिसतात.

गेंद :

गवतवर्गीय वनस्पती आहे. धनगर जसा फेटा घालतो, त्याप्रमाणे या गवताच्या दांड्यावर टोपीसारखा भाग येतो म्हणून यास धनगर गवत म्हणतात. पांढरा रंग फुलून भरपूर प्रमाणात दिसतो म्हणून गेंद म्हणतात.

ड्रोसेरा बुरमानी/लाल दवबिंदू

ही कीटकभक्षी वनस्पती आहे. सप्टेंबर महिन्यात येते. देठ हिरव्या व लाल रंगाचा असतो. त्यावर केस वाहिन्यांचे जाळे असते. स्थानिक नाव लाल दवबिंदू आहे.

मोठी गौळण (पोगॅस्टमन डेकनांसीस)

सप्टेंबर महिन्यात पाणी साचते व आटते. अशा ठिकाणी ही वनस्पती दिसते. त्यावर लहान पानांमधून तुरा येतो. याची फुले निळसर रंगांच्या तुऱ्याप्रमाणे असतात. घरातील तुळशीच्या मंजिरी ज्याप्रमाणे दिसतात, त्याप्रमाणे याचे तुरे दिसतात. म्हणून यास निळी मंजिरी देखील म्हणतात

भुईकारवी (टोपली कारवी)

जमिनीवर टोपलीसारखा आकार असतो म्हणून टोपली कारवी म्हणतात. याच्या पानांना छोटे पांढरट रंगाचे केस असतात. सूर्याचे किरण पडल्यावर सुंदर व मोहक दिसतात. याच्या मुळापासून फुटवा येतो व त्याचा प्रसार होतो.

अभाळी

ही गवतवर्गीय वनस्पती आहे. याची पाने व देठ जाडसर असतो. त्यावर सप्टेंबरच्या आसपास आभाळी रंगांचे कप्प्या-कप्प्याचे फूल येत असते. त्याच्यावर अनेक भाग दिसतात.

कंदीलपुष्प

ही वेलवर्गीय वनस्पती असून, एकूण सात जातींपैकी दोन जाती गवतवर्गीय आहेत. जून ते सप्टेंबरपर्यंत फुले येतात. एखाद्या माणसाने हातात कंदील घेतला आहे, असे वाटते म्हणून कंदील पुष्प म्हणतात.

कोट

पठारावर साधारण तीस ते पस्तीस टक्के फुले फुलली असून, ऊन व पाऊस असे वातावरण राहिल्यास काहीच दिवसांत मोठ्या प्रमाणावर फुलांचे गालिचे पाहावयास मिळणार आहेत. फुले पाहत असताना फुलांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता पर्यटकांनी घ्यावी. आम्हाला सहकार्य करून फुलांचे सौंदर्य टिकवावे.

मारुती चिकणे, अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती

छाया -सागर चव्हाण