शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अधिकाऱ्यांवर दबाब आणून विजय

By admin | Updated: July 7, 2015 22:27 IST

अविनाश मोहिते : कऱ्हाडात संस्थापक पॅनेलच्या मेळाव्यात विरोधकांवर टीकास्त्र

कऱ्हाड : कृष्णा कारखान्याची पाच वर्षापूर्वीची निवडणूक ऐतिहासिक अशी झाली होती. त्यानंतर पाच वर्षात संस्थापक पॅनेलच्या माध्यमातून जी कामे केली ती सभासदांना माहिती आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा आणि सत्तेचा वापर झाला. विरोधकांनी राजकीय ताकदीच्या जोरावर अधिकाऱ्यांवर दबाव आणून निवडणूक जिंकली आहे. त्यांनी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळे अधिकारी मॅनेज केले. मतमोजणीवेळी झालेल्या गैरप्रकाराबाबत आम्ही न्यायालयात जाणार आहोत. मॅचफिक्सींग ज्याप्रमाणे होते, त्याप्रमाणे या निवडणूकीत मतमोजणीवेळी मतांचीही फिक्सींग झाल्याचा प्रकार घडला आहे. असे मत संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी व्यक्त केले.यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणूकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संस्थापक पॅनेलतर्फे मंगळवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, शेकापचे नेते अ‍ॅड. रवींद्र पवार, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील-शेरेकर, अशोक थोरात, अ‍ॅड. सी. बी. कदम आदींसह कऱ्हाड, वाळवा, कडेगाव तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.अविनाश मोहिते म्हणाले, निवडणूकीत सहकार पॅनेल व रयत पॅनेलच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात आमच्या विरोधात कारस्थाने रचली. मतांसाठी सभासदांच्या खिशात जबरदस्तीने पैसे खिशात घातले. तरी सुद्धा सभासदांनी संस्थापकला जास्त मते दिली आहेत. आज फेरमतमोजणी के ल्यास दिसून येईल की कोणाला किती मते पडली आहेत. त्यामुळे आम्ही या फेममतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी संजीव देशमुख यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत.आज हा कारखाना चुकीच्या माणसाच्या हातात गेला आहे. कृष्णा कारखान्याच्या जिवावर जयवंत शुगर, ट्रस्ट उभे राहिले आहे. कारखान्याकडे लाकूड शिल्लक नाही असे, सांगणाऱ्यांना माहिती नाही की, कारखान्याकडे अजुनही ९० लाख साखरेची पोती, २० लाख टन मोलॅसिस तसेच लाकूड शिल्लक आहे.जर कारखान्याच्या सभासदांना ऊसाचा कमी दर दिला तर याद राखा, जयवंत शुगरमध्ये ज्यापद्धतीने काटेमारी केली जाते त्याप्रमाणे कृष्णा कारखान्यात काटेमारी होवू देणार नाही. कारखान्याच्या माध्यमातून जयवंत शुगर चालविण्याचा प्रयत्न केल्यास त्यानां जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. असे मत संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहित यांनी व्यक्त केले.निवडणूकीत भानगडी करून मते खाता येतात मात्र, माणसे तोडता येत नाहीत. निवडणूकीत मतमोजणी झाली त्यामध्ये सात हजाराहून अधिक मते बाद निघाली. ती नक्की बाद झाली आहेत का हे पहाणे गरजेचे आहे. संस्थापकच्या या निवडणूकीच्या व न्यायालयाच्या लढाईत श्रमिक मुक्ती दल तुमच्या पाठिशी असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)पोराला जरा आवरा,सहकार पॅनेलच्या सुरेश भोसलेंनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, त्यांनी त्यांच्या पोराला आवरावे. तो काहीही बोलतोय, त्याच त्याला कळत नाही की, काय बोलावं अन् काय नाहीते. आदीच पोराला झेड सिक्युरिटी लागते. याचं भान त्यांनी ठेवावं. अशा शब्दात संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी सुरेश भोसले व अतुल भोसले यांचा खरपूस समाचार घेतला.