शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

उपाध्यक्षांनी घेतला कोंडवेचा आढावा

By admin | Updated: January 23, 2015 23:38 IST

‘ग्राम संसद’ योजना : आगामी कामाचीही ठरली रणनीती--गाव बदलतंयगड्या

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘ग्राम संसद’ योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या कोंडवे गावाने आजवर केलेल्या विकासकामांचा आढावा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी घेतला. यावेळी भविष्यात राबवायच्या विविध योजनांचीही रूपरेषा ठरविण्यात आली.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात गुरुवारी बैठक झाली. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवी शिवदास यांच्यासह कोंडवे गावातील सरपंच शरद बोडके, उपसरपंच सचिन भुजबळ उपस्थित होते.‘ग्राम संसद’ योजनेंतर्गत कोंडवे गाव दत्तक घेतल्यापासून कोंडवे ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला हाताशी धरून अनेक नवनवीन उपक्रम राबविले आहेत. याची माहिती यावेळी देण्यात आली. यामध्ये अनेक वर्षांपासूनचे अतिक्रमण काढण्यात आले. त्याचप्रमाणे स्मशानभूमीचा रस्ता समोपचारातून खुला करण्यात यश आले आहे. निर्मल गाव करण्याच्या दृष्टीने गावातून रंगरंगोटी केली असून, परिसरात श्रमदानातून स्वच्छता केली जाते. तसेच विविध घोषवाक्य तयार केलेले फलक लावण्यात आले आहेत.कोंडवेच्या विकासासाठी काही कामे करावे लागणार आहेत. याविषयीही चर्चा करण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, ग्रामपंचायतीच्या इमारतीला मंजुरी देणे, कालवे दुरुस्ती, बंधारे बांधण्यासंदर्भात चर्चा झाली. ग्रामपंचायत इमारतीला मंजुरी लवकरच देण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. यावेळी बाळासाहेब चोरगे, मधुकर निंबाळकर, बाळासाहेब ननावरे, दिलीप निंबाळकर, सुभाष निंबाळकर, अधिकराव निंबाळकर, ग्रामसेवक एम. जी. माने उपस्थित होते. (प्रतिनिधी)