शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या ग्रामपंचायतीत आता गांडूळ खतनिर्मिती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये घनकचरा व गांडूळ खत निर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी बुधवारी कºहाड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीने राबविलेल्या प्रकल्पाची पाहणी केली. अशाच पद्धतीने जिल्ह्यात इतरही गावांमध्ये एक वेगळा प्रयोग करण्याचा निर्धार जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.बनवडी ग्रामपंचायतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये घनकचरा व गांडूळ खत निर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी बुधवारी कºहाड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीने राबविलेल्या प्रकल्पाची पाहणी केली. अशाच पद्धतीने जिल्ह्यात इतरही गावांमध्ये एक वेगळा प्रयोग करण्याचा निर्धार जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.बनवडी ग्रामपंचायतीने अत्यंत नेटके नियोजन करून घनकचरा निर्मिती व गांडूळ खत निर्मितीचा मोठा प्रकल्प सुरू केला आहे. या ग्रामपंचायतीतर्फे रोज घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा केला जातो. ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करून तो कचरा प्रकल्पात आणून त्यावर प्रक्रिया केली जात आहे. ग्रामपंचायतीतर्फे याबदल्यात ग्रामस्थांकडून स्वच्छता कर घेते. या करातूनच कचरा वाहून आणून त्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पाचा खर्च भागवला जातो.दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी बुधवारी बनवडी गावाला भेट दिली. कºहाड पंचायत समितीमध्ये कामाचा आढावाही घेतला. बनवडी गावातील प्रकल्पाची पाहणी करत असताना डॉ. शिंदे यांनी बनवडी ग्रामस्थांच्या वेगळ्या प्रयोगाचे कौतुक केले. तसेच असा प्रकल्प ही काळाची गरज असल्याचे सांगितले. स्वच्छतेसाठी शासन आग्रही आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच गावे स्वच्छ करण्याचा संकल्पच डॉ. शिंदे यांनी या ठिकाणी सोडला.बनवडीतील गांडूळ खत निर्मिती प्रकल्पामध्ये ग्रामपंचायतीने पॅकिंग व्यवस्था केली आहे. या खताला शेतकºयांची मोठी मागणी आहे. कºहाड तालुक्यातील अनेक गावांनी खताची मागणी केली आहे. साहजिकच शेतकºयांची गरज पाहता खत निर्मिती कमी प्रमाणात होत असल्याने इतर गावांनीही पुढाकार घेतल्यास घनकचरा निर्मूलन व गांडूळ खत निर्मिती ही दोन्ही उद्दिष्ट्ये साध्य केली जाऊ शकतात.सध्या शहरांसह ग्रामीण भागांमध्येही घनकचºयाचा प्रश्न डोके वर काढणारा ठरला आहे. भविष्यामध्ये घनकचºयाची समस्या गंभीर रूप धारण करू शकते.बनवडी गावच्या २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना व ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत गांडूळ खत प्रकल्पाला भेट दिली. त्याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता पाटील, उपअभियंता आरळेकर, शंकरराव खापे, सरपंच, ग्रामसेवक, सदस्य उपस्थित होते.१० रुपये किलोने विकणार खतबनवडी ग्रामपंचायतीने राबविलेला प्रयोग ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पाडणारा आहे. गांडूळ खत प्रतिकिलो १० रुपये दराने विकले जाते. शेतीच्या सुपीकतेसाठी हे खत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने शेतकºयांचीही खताला मागणी आहे. खत विकून ग्रामपंचायतीला हे आर्थिक उत्पन्न मिळणार असल्याने गावांच्या विकासासाठी हा निधी वापरला जाऊ शकतो.