शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाचवड उड्डाणपूलावरून धावली वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:28 IST

पाचवड उड्डाणपूलावरून धावली वाहने

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : जिल्हाधिकारी श्वेता सिंंघल यांच्या आदेशावरून महावितरणने आपल्या देखरेखीखाली आयटीडीच्या एजन्सीमार्फत उड्डाणपूलावरील वाहतूकीस अडथळा ठरलेली हायटेन्शन लाईन काढून घेतली. त्यानंतर आयटीडीने मंगळवार, दि. १८ रोजी सकाळपासून पाचवडच्या उड्डाणपूलावरून सातारहून पुण्याकडे जाणारा मार्ग वाहतूकीसाठी खुला करून वाहतूक सुरू केली.‘लोकमत’ने पाचवडचा उड्डाणपूल वाहतूकीसाठी सज्ज या मथळ्याखाली रविवारी याबाबत सविस्तर वृत्त दिले होते. त्यानंतर दोन दिवसातच उड्डाणपूलावरून वाहतुक सुरू झाली.आनेवाडी, उडतरे, सुरूर व जोशी विहीर येथील उड्डाणपूलांची कामे पूर्ण झाल्यानंतर भुर्इंज व पाचवडच्या उड्डाणपूलांची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र ही कामे सुरू असतानाच भुर्इंज येथील किसनवीर कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर बांधण्यात आलेला उड्डाणपूल कोसळला तर पाचवड येथील उड्डाणपूलाला भगदाड पडले त्यामुळे या दोन्ही उड्डाणपूलांच्या कामाच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांबरोबरच स्थानिकांनीही अनेकदा याबाबत आवाज उठविला होता. या सर्व प्रकारानंतर एकेरी वाहतूक सुरू असलेल्या भुर्इंजच्या उड्डाणपूलाच्या दोन्ही वाहतूकीसाठी खुल्या झाल्या. मात्र पाचवडच्या उड्डाणपूलावरून महावितरणची हायटेन्शन लाईन गेल्याने काम पूर्ण होऊनही तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. महामार्गांच्या अशाप्रकारच्या सर्व अडथळ्यांबाबत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी न्हाई, रिलायन्स व आयटीडीचे अधिकारी तसेच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. या आदेशावरून महावितरणने आयटीडीने नव्याने नेमलेल्या एजन्सीकडून शनिवारी दुपारी पाचवड उड्डाणपूलावरून वाहतूकीस अडथळा ठरणारी महावितरणची हायटेन्शन लाईन काढून घेऊन वाहतूकीचा अडथळा दूर केला. त्यानंतर मंगळवारी सकाळी उड्डाणपूलावरून सातारकडून पुणेकडे जाणाऱ्या लेनवरून प्रथम वाहतूक सुरू केली.