शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांनी साडेतीन हजार जीव चिरडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:37 IST

कऱ्हाड : अपघातात कुणाचा जीव गेला तर आपण हळहळतो; पण दररोज अनेक निष्पाप जीव वाहनांच्या टायरखाली सर्रास चिरडले जात ...

कऱ्हाड : अपघातात कुणाचा जीव गेला तर आपण हळहळतो; पण दररोज अनेक निष्पाप जीव वाहनांच्या टायरखाली सर्रास चिरडले जात आहेत. त्याची कुणाला दाद नाही आणि सोयरसुतक तर नाहीच नाही. गत काही वर्षांत असेच तब्बल साडेतीन हजार जीव वाहनांनी चिरडल्याची धक्कादायक बाब कऱ्हाडच्या ‘एम. एन. रॉय’ या पर्यावरणीय संस्थेने केलेल्या निरीक्षणातून समोर आली आहे.

अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक असणाऱ्या प्राणी, पक्ष्यांना मानवनिर्मित कारणांमुळे आपला जीव गमवावा लागतोय. वाहनांच्या धडकेतही दरवर्षी शेकडो प्राणी-पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. गत एकोणीस वर्षांत ३ हजार २२८ प्राणी व पक्ष्यांचा वाहनांखाली बळी गेल्याचा निष्कर्ष एम. एन. रॉय अनौपचारिक शिक्षण व संशोधन संस्थेने निरीक्षणातून काढला आहे. संस्थेच्या पर्यावरण विभागाचे संचालक सुधीर कुंभार यांनी २००२ सालापासून निरीक्षणाचे काम हाती घेतले. अल्केश ओहळ, देवानंद पांढरपट्टे, बबन साबळे, सुनील जंगम, बी. ए. चोरघे यांची त्यासाठी त्यांनी मदत घेतली. कऱ्हाड ते ढेबेवाडी या २५ किलोमीटर रस्त्याची निरीक्षणासाठी निवड करण्यात आली. दररोज न चुकता डॉ. कुंभार यांच्यासह त्यांचे सहकारी या मार्गावरून प्रवास करतात. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पक्षी व प्राण्याची ते नोंद घेतात. त्याचे छायाचित्र घेतात. तसेच ही सर्व माहिती ते संकलित करून वर्षाअखेरीस त्याचे वर्गीकरण करतात. गत एकोणीस वर्षांपासून त्यांचे हे काम अविरतपणे सुरू आहे.

- चौकट

काही वाचवतात; काही मुद्दाम चिरडतात!

निरीक्षणाचा एक भाग म्हणून डॉ. सुधीर कुंभार यांनी काही चालकांशी चर्चा केली. त्यावेळी काहींनी प्राणी, पक्षी रस्त्यावर दिसल्यास त्याला वाचविण्याचा प्रयत्न करतो, असे सांगितले. मात्र, ‘प्राणी, पक्ष्यांसाठी स्वत:चा जीव धोक्यात कसा घालणार?’ असेही काहींनी सांगितले. प्राणी किंवा पक्ष्याला मुद्दाम चिरडणारे काही बेदरकार चालकही असल्याचे डॉ. कुंभार यांनी सांगितले.

- चौकट

अन्नासाठी मृत्यूच्या दाढेत

रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या प्राण्याचे मांस खाण्यासाठी येणाऱ्या इतर प्राणी व पक्ष्यांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्याचे निरीक्षण संस्थेने नोंदविले आहे.

- कोट

प्राणी असो अथवा पक्षी, तेही एक जीवच आहेत. हे जीव वाचविणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जबाबदारीने वाहन चालविल्यास असे मृत्यू टाळता येतील. त्यासाठी आम्ही चालकांमध्ये जागृती करतो. तसेच जखमी प्राणी अथवा पक्षी सापडल्यास त्याला तातडीने वैद्यकीय उपचार देतो.

- डॉ. सुधीर कुंभार, संचालक,

एम. एन. रॉय संस्था, कऱ्हाड

- चौकट

अपघाती मृत्यूचे प्रमाण

सरपटणारे प्राणी : ४८%

सस्तन प्राणी : ३३%

पक्षी : १९%

- चौकट

दहा वर्षांतील बळी

वर्ष : प्राणी : पक्षी

२०१०-११ : १८९ : ६२

२०११-१२ : १४८ : ५२

२०१२-१३ : १७८ : ६४

२०१३-१४ : १४० : ५१

२०१४-१५ : १२९ : ३३

२०१५-१६ : ११३ : २९

२०१६-१७ : १०० : ६३

२०१७-१८ : १३४ : ५०

२०१८-१९ : १४५ : ५५

२०१९-२० : १८० : १०९

२०२०-२१ : ११४ : ३३

- चौकट

एप्रिल २०२० ते मार्च २०२० अखेर...

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या एका वर्षात ३१ सरडे, ३५ साप, ७ कोंबड्या, २ बुलबुल, १ बगळा, ३ सातभाई, ३ भारद्वाज, २० श्वान, १२ मांजर, १० उंदीर, १ मुंगूस, १ वानर, १ उदमांजर, १ खार असे ६८ सरपटणारे प्राणी, ३३ पक्षी आणि ४६ सस्तन प्राणी २५ किलोमीटरमध्ये वाहनाखाली चिरडल्याचे समोर आले.

फोटो : १३केआरडी०१

कॅप्शन : प्रतीकात्मक