शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वासुदेवालाही उदयनराजेंची झप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 23:07 IST

सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे एक अजब रसायन आहे. त्यांना कधी काय आवडेल, याचा काही नेम नाही. कधी ...

सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे एक अजब रसायन आहे. त्यांना कधी काय आवडेल, याचा काही नेम नाही. कधी शेतात शेतकरी नांगरट करताना दिसला तर त्याचे औत चालविणार तर कधी गवताने भरलेल्या बैलगाडीचे सारथ्य करणार. कलाकार हा तर त्यांचा विक पॉर्इंट. असाच एक वासुदेव त्यांना पार्किंगमध्ये सापडला आणि त्यालाही उदयनराजेंची जादूची झप्पी मिळाली. उदयनराजेंच्या या झप्पीने वासुदेवालाही आभाळ ठेंगणं झालं.समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे करण्याची किमया खासदार उदयनराजे भोसले यांना चांगली जमते. त्यामुळेच त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाआहे. खासदार उदयनराजे भोसले यांना भेटलेल्या वासुदेवाला त्यांनी संपूर्ण गाणे म्हणायला लावले. वासुदेवानेही अत्यंत तन्मयतेने ते गाणे म्हटले.वास्तवातील अनेक गोष्टी त्याने आपल्या गाण्यातून मांडल्या. या गाण्यातील ‘समदं माझं-माझं...काही नाही वेड्या तुझं...फकस्त धरतीला तुझं वझं...सारा मायेचा बाजार...सारं इथंच राहणार...बघ ही काया दोन घडीची...पोकळ माया नाही कामाची...’ या ओळी उदयनराजेंना अधिक भावल्या. त्यामुळे ते संपूर्ण गाणे पूर्ण होईपर्यंत थांबले आणि त्याच्या गाण्याला मनापासून दादही दिली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी वासुदेवाला घट्ट मिठी मारत जादूची झप्पीही दिली.