आदर्की : शासन शेतकरी व कृषी उद्योग उभारण्यासाठी विविध योजना राबवत आहे. त्याप्रमाणे जयवंत केंजळे व सहकारी यांनी कृषिमाल प्रक्रिया उद्योग सुरू करून जे. के. एक्सपोर्ट या नावाने व्यवसाय सुरू केला आहे. त्यांना कृषी विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही जिल्हा कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी दिली.
आळजापूर (ता. फलटण) येथील जे. के. अॅग्रो एक्सपोर्ट फळे, भाजीपाला प्रक्रिया उद्योगाला काळे यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. काळे म्हणाले, ‘फलटण तालुक्यात पाणी आले. त्याप्रमाणे शेती प्रक्रिया उद्योग उभारणीला वाव आहे. तरुणांनी शेतीशी निगडीत उद्योग सुरु केल्यास कृषी खाते सहकार्य करणार आहे.’
जयवंत केजळे म्हणाले, ‘शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या उद्योगाची उभारणी केली आहे. शेतकऱ्यांचा सर्वप्रकारचा भाजीपाला, फळे खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून देश, विदेशात पाठवून शेतकऱ्यांना फायद्याची शेती करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे.’
यावेळी संत कृपा डेअरीचे अध्यक्ष विलासराव नलवडे, दिलीप नलवडे, भारत जाधव, विश्राम जाधव, भास्कर कोळेकर, दौलत चव्हाण, मिलिंद दीक्षित, सुहास रणसिंग, भूषण यादगीर, सुशील मोहिते, हरिश्चंद्र धुमाळ, दतात्रय येळे, सतीश हिप्परकर उपस्थित होते.
फोटो ०६आदर्की एडीव्हीटी
आळजापूर येथे जे. के. अॅग्रोला जिल्हा कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी भेट दिली. यावेळी विलासराव नलवडे, जयवंत केंजळे, भारत जाधव उपस्थित होते.