शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

वॉटर कपमधील विजेत्यांसाठी पुण्यात कौतुक सोहळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 15:15 IST

सातारा : पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बालेवाडी (पुणे) येथील श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे. वॉटर कपमधील विजेत्यांना सन्मानित आणि या स्पर्धेतील हिरोंचे कौतुक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशनचे सह संस्थापक आमीर खान उपस्थित राहणार आहेत.  दरवर्षी ...

ठळक मुद्देकार्यक्रमाला मुख्यमंत्री, आमीर खानही उपस्थित राहणार   ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बालेवाडी (पुणे) येथे कार्यक्रमयेथील श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे १३ जिल्ह्यातील ३० तालुक्यांचा समावेशवॉटर कपमधील विजेत्यांचा सन्मान

सातारा : पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बालेवाडी (पुणे) येथील श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे. वॉटर कपमधील विजेत्यांना सन्मानित आणि या स्पर्धेतील हिरोंचे कौतुक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशनचे सह संस्थापक आमीर खान उपस्थित राहणार आहेत.  

दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक गावांना दुष्काळाच्या भीषण संकटाचा सामना करावा लागतो. गावांना दुष्काळाच्या या मगरमिठीतून सोडविण्याचे व जलसंधारणाच्या मार्गाने गावांना पाणीदार करण्याचे काम पाणी फाउंडेशन मागील दोन वर्षांपासून करत आहे. केवळ लोकचळवळीतून दुष्काळावर मात करता येते. या विचारातून २०१६ मध्ये अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांनी पाणी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली.

या फाउंडेशनने लोकांना जलसंधारणाचे विज्ञान शिकवण्यासाठी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी खास ट्रेनिंग प्रोग्रामची आखणी केली आहे. गावातल्या लोकांना एकत्र आणून ट्रेनिंगमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर गावकºयांनी करावा यासाठी पाणी फाउंडेशनतर्फे दरवर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले जाते. 

पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ म्हणाले, ‘हा समारंभ म्हणजे सामाजिक स्तरातील विविध लोकांचा संगम असेल. शेतकरी, उद्योजक, अभिनय क्षेत्राशी संबंधित अनेक व्यक्ती, शास्त्रज्ञ, सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते हे सर्व एकत्र येऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या ग्रामस्थांच्या प्रयत्नांचा गौरव करणार आहेत. 

पाणी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव यांनीही या वॉटर कपनिमित्त गावागावांमध्ये आलेल्या त्यांच्या अनुभवाविषयी सांगितले. गावांमधील लोकांचा, विशेषत: महिलांचा या चळवळीतील सहभाग पाहून मी भारावून गेले आहे. गावांमध्ये असणाºया प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून या चळवळीसाठी योगदान देण्याची त्यांची भावना वाखाणण्याजोगी आहे. १३ जिल्हे ३० तालुके...सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ मध्ये सहभागी झालेल्या १३ जिल्ह्यांतील ३० तालुक्यांमध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज आणि धारुर. लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा आणि कळंब. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री आणि खुलताबाद, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, माण आणि खटाव, पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि इंदापूर, सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि जत, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि उत्तर सोलापूर, अकोला जिल्ह्यातील बार्शी-टाकळी, पातूर आणि आकोट, वाशिम जिल्ह्यातील कारंजा, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, कळंब आणि उमरखेड, वर्धा जिल्ह्यातील आर्वी, अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि धारणी या गावांचा समावेश होता.